IPL 2025 GT vs PBKS 5th Match Player to Watch Shubman Gill Gujarat Titans : टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ घरचे मैदान असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरुन आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर सामना रंगणार म्हणजे हा 'दिल का मामला' अन् 'गिल है की मानता नहीं' शो पाहण्याची पर्वणीच. या मैदानात शुबमन गिलचा रेकॉर्ड हा एकदम तगडा आहे. पण यंदाचा हंगाम त्याच्यासाठी कॅप्टन्सीची कसोटी असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जगातील सर्वोत मोठ्या स्टेडियमवर एकदम भारीये गिलचा रेकॉर्ड
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये अहमदाबादच्या मैदानात खेळताना त्याने १२ सामन्यात ६६.९० च्या सरासरीसह दोन शतके आणि तीन अर्धशतकांसह ६६९ धावा काढल्या आहेत. आयपीएल २०२३ च्या प्लेऑफ लढतीत मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने ६० चेंडूत १२९ धावा ठोकल्या होत्या. हीच त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. पुन्हा तो या मैदानात आपला रुबाब दाखवून देणार का? ते पाहण्याजोगे असेल.
IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे'
गत हंगामात नेतृत्वाची ट्रायल झाली, आता धमक दाखवण्याची वेळ
शुबमन गिल हा भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. भविष्यातील तो कर्णधारपदाचा दावेदारही मानला जातोय. ही दावेदारी भक्कम करण्यासाठी आयपीएलमध्ये त्याला नेतृत्वातील धमक दाखवण्याची एक चांगली संधी आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०२२ च्या हंगामात गुजरात टायटन्सच्या संघानं ८ कोटी रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात घेतले. गत हंगामात नेतृत्वाच्या बढतीसह गिलची पगार वाढ झाली. त्याचे सध्याचे पॅकेज हे १६.५० कोटी इतके आहे. २०२२ मध्ये पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्स संघानं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावत इतिहास रचला होता. हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात गेल्यावर शुबमन गिल गुजरात संघाचा कर्णधार झाला आहे. गत हंगामातील त्याच्या नेतृत्वाखाली संघाला फक्त ५ सामन्यात विजय मिळवता आला. यावेळी ही कामगिरी सुधारण्यासह कॅप्टन्सीची छाप सोडण्याचं चॅलेंज घेऊन तो मैदानात उतरेल.
शुबमन गिलची आयपीएलमधील एकंदरीत कामगिरी
शुबमन गिल याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १०३ सामने खेळले आहेत. यात ४ शतकं आणि २० अर्धशतकाच्या जोरावर त्याने आपल्या खात्यात ३२१६ धावा जमा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात तो फलंदाजीसह नेतृत्वात कशी कामगिरी करतोय ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: IPL 2025 GT vs PBKS 5th Match Lokmat Player to Watch Shubman Gill Gujarat Titans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.