IPL 2025 GT vs MI Eliminator : चंडीगड येथील मुल्लानपूरच्या मैदानात रंगलेल्या एलिमिनेटच्या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावरप्लेमध्ये तुफान फटकेबाजी करत जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मानं संघाला दमदार सुरुवात करून देत त्याचा हा निर्णय सार्थ ठरवला. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्यानंही गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. उत्तुंग फटकेबाजीसह हार्दिक पांड्याने तर मैफिल लुटलीच याशिवाय त्याच्या सिक्सरमुळे आणखी एक सुंदर चेहरा लक्षवेधी ठरल्याचे पाहायला मिळाले.
हार्दिकची कडक फटकेबाजी, त्याचा सिक्सर पाहून फॅन गर्ल झाली 'कावरी बावरी'
अखेरच्या षटकात हार्दिक पांड्यानेही जबरदस्त बॅटिंग केली. त्याने आपल्या छोट्याखानी खेळीत तीन उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. त्याने मारलेला एक षटकार पाहून स्टेडियम स्टँडवर MI ला चीअर करायला आलेल्या MI च्या मिस्ट्री गर्लची रिअॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. हार्दिक पांड्याचा उत्तुंग फटका पाहिल्यावर तिची अवस्था काय करू अन् काय नको अशी झाली होती. शेवटी ती दोन हात उंचावून पांड्याच्या फटकेबाजीचा आनंद व्यक्त करताना दिसून आले. पांड्याच्या षटकाराशिवाय सोशल मीडियावर तिचा स्टँडमधील अतरंगी अंदाज चर्चेचा विषय ठरल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएल सामन्यावेळी आपल्या खास अंदाजाने अनेक मिस्ट्री गर्ल्संनी लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आता या यादीत आणखी एका सुंदरीचा समावेश झाला आहे.
MI कडून प्रत्येक बॅटरनं दाखवली धमक, पांड्यान आपल्या स्टायलिश अंदाजात दिला फिनिशिंग टच
जॉनी बेअरस्टोनं ४७ (२२) स्फोटक अंदाजात डावाला सुरुवात करून दिल्यावर रोहित शर्माच्या भात्यातून आलेल्या दमदार अर्धशतकी ८१ (५०) खेळीनंतर सूर्यकुमार यादव ३३ (२०), तिलक वर्मा २५ (११) यांनी संघासाठी उपयुक्त योगदान दिले. अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याने ९ चेंडूत नाबाद २२ धावांची खेळी केली. गुजरातच्या ताफ्यातून २० वे षटक घेऊन आलेल्या जेराल्ड कोएट्झी याच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने ३ षटकार मारले. या षटकात केलेल्या २२ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद २२८ धावा केल्या. एलिमिनेटरची लढत २०० पारची करत MI नं निम्मी लढाई जवळपास जिंकलीये. कारण आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात २०० धावा केल्यावर मुंबई इंडियन्सचा संघ कधीच पराभूत झालेला नाही.
Web Title: IPL 2025 GT vs MI Eliminator Hardik Pandya MI Mystery Girls Reaction Goes Viral Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.