Join us

IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी

२०० पारच्या लढाईत आघाडी फलंदाजांनी नांगी टाकल्यावर मध्यफळीतील फलंदाजांची होती परीक्षा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 00:04 IST

Open in App

Gujarat Titans vs Lucknow Super Giants, 64th Match : प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट झालेल्या लखनौच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या आणि क्वालिफायर १ खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गुजरात टायटन्सला पराभवाचा धक्का दिला आहे. मिचेल मार्श ११७ (६४) चे दमदार शतक आणि निकोलस पूरन ५६ (२७) याच्या  अर्धशतकाच्या जोरावर  लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन २१ (१६), शुबमन गिल  ३५ (२०) आणि जोस बटलर ३३ (१८) हे तिघे पहिल्यांदाच १० षटकांच्या आत माघारी फिरले. या परिस्थितीत लखनौच्या संघाच्या मध्यफळीची खरी कसोटी होती. पण त्यात फक्त शाहरुख खान अर्धशतकी खेळीसह काटावर पास झाला. पण बाकी सर्व नापास झाल्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाने हा सामना गमावला. या सामन्यातील पराभवामुळे पहिल्या दोनमध्ये टिकून राहण्याचं मोठं चॅलेंज त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

LSG च्या ताफ्यातून मार्शचं शतक, पूरनने अर्धशतकासही लुटली मैफिलशुबमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण त्याचा हा निर्णय मार्करम मिचेल मार्श जोडीनं चुकीचा ठरवला. लखनौच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची दमदार भागीदारी रचली. मार्करम २४ चेंडूत ३६ धावा करून माघारी फिरल्यावर मिचेल मार्श अन् निकोलस पूरन ही जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शनं ६४ चेंडूत १० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. तो यंदाच्या हंगामात शतक झळकवणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला. निकोल पूरनने २७ चेंडू केलेल्या नाबाद ५६ धावांच्या खेळीसह पंतने ६ चेंडूत केलेल्या १६ धावांच्या जोरावर लखनौच्या संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २३५ धावा लावल्या होत्या. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५गुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्सशुभमन गिलजोस बटलरइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट