IPL 2025 GT vs DC 35th Match : अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा दमदार कामगिरी करताना दिसतोय. नव्या नेतृत्वाखाली आशुतोष शर्मा पासून ते अगदी अनुभवी केएल राहुलपर्यंत प्रत्येकजण आपल्यातील कर्तृत्व दाखवून देत संघासाठी उपयुक्त कामगिरी करताना दिसत आहे. यातीलच एक नाव म्हणजे अभिषेक पोरेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कडक फलंदाजीसह विकेटमागचा उत्तम पर्याय
२३ वर्षीय विकेट किपर बॅटरची यंदाच्या हंगामातील कामगिरी लक्षवेधी ठरताना दिसते. डावखुऱ्या हाताने कडक फलंदाजीसह विकेटमागे चपळ यष्टीरक्षण करण्यात पटाईत असणाऱ्या या खेळाडूला अक्षर पटेल वेगवेगळ्या क्रमांकावर आजमावताना दिसतोय. काही सामन्यात तो मध्यफळीतील जबाबदारी पार पाडताना दिसला. मागील दोन सामन्यात त्याला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. केएल राहुल नसताना तो विकेटमागे दिसला. त्याच्यातील ही क्षमता तो संघासाठी उपयुक्त किती उपयुक्त खेळाडू आहे तेच अधोरेखित होते.
IPL 2025 : धोनीनं धु धु धुतल्यावर भज्जीचा सल्ला आलेला कामी; आता तो GT च्या ताफ्यातून ठरतोय लक्षवेधी
पश्चिम बंगालच्या गड्याला पंतच्या जागी संधी मिळाली अन् तो दिल्लीकर झाला
अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या पश्चिम बंगालच्या विकेट किपर बॅटरला २०२३ च्या हंगामात पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. २० लाख या मूळ किंमतीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. पदार्पणाच्या हंगामात तो फक्त ४ सामने खेळला. पण २०२४ च्या हंगामात १४ सामन्यात त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली. गत हंगामात त्याने १५९.५१ च्या स्ट्राइक रेटनं ३२७ धावा कुटल्या होत्या. याच हंगामात ६५ धावांसह त्याने आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी केली होती. २ अर्धशतकासह आतापर्यंत त्याने २४ सामन्यात ५१६ धावा केल्या आहेत.
सौरव गांगुलीच्या तालमीत घडलाय; मग तेवर तर दिसणारच ना!
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पश्चिम बंगालकडून खेळताना फलंदाजीसह विकेटमागे चपळाई दाखवल्यावर अभिषेक पोरेलची तुलना ही वृद्धिमान साहासोबत होऊ लागली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघात सामील झाल्यावर क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुलीकडून त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. या दिग्गजांच्या तालमीत घडल्यामुळे त्याची कामगिरी आणखी उंचावण्यास मदत मिळालीये. देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप सोडल्यावर आता तो जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत धमक दाखवताना दिसतोय. यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघाकडून तो आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
Web Title: IPL 2025 GT vs DC 35th Match Lokmat Player to Watch Abishek Porel Delhi Capitals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.