IPL 2025 Chennai Super Kings thrashes Gujarat Titans : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने प्लेऑफ्समध्ये टॉपला जाण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २३० धावा करत गुजरात टायटन्सच्या संघासमोर २३१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायन्सचा संघ १४७ धावांवरच आटोपला. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ८३ धावांनी हा सामना खिशात घातला. हा विजय मिळवूनही चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत तळालाच राहिला. पण जाता जाता CSK नं या विजयासह MI ला एक खास गिफ्टच दिले आहे. कारण चेन्नई सुपर किंग्जच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला आता प्लेऑफ्समध्ये टॉप २ मध्ये एन्ट्री करण्याची संधी आहे. हा डाव साधण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाला आता पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना जिंकावा लागेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साई सुदर्शनच्या ४१ धावा वगळता कुणाचाच निभाव नाही लागला
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची फार्मात जोडी २४ धावांवरच फुटली. शुबमन गिलच्या रुपात अंशुल कंबोजनं संघाला पहिले यश मिळवून दिले. गिल १३ (९) माघारी फिरल्यावर जोस बटलरही ५ धावांवर माघारी फिरला. खलील अहमदनं ही महत्त्वपूर्ण विकेट घेतली. साई सुदर्शन याने २८ चेंडूत ४१ धावांची खेळी केल्या. जड्डूनं त्याला रोखलं सामना चेन्नईसाठी आणखी सोपा केला.
IPL 2025 : विदर्भकराला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी SRH कडून फिरकीतील जादू दाखवण्याची संधी
टॉप २ मध्ये मजल मारणं झालं मुश्किल
गुजरातचा संघ प्लेऑफ्समध्ये पोहचणारा पहिला संघ ठरला होता. आपल्यासोबत GT नं पंजाब किंग्ज अन् आरसीबीचाही प्लेऑफ्सचा मार्ग मोकळा केला होता. हा संघ यंदाच्या हंगामात गुणतालिकेत टॉपला राहिल असे वाटत होते. पण आता ते मुश्किल झाले आहे. आरसीबीनं आपला अखेरचा सामना गमावला तरच गुजरातचा संघ प्लेऑफ्सच्या अव्वल दोनमध्ये पोहचू शकतो. दुसरीकडे मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला आपापला सामना जिंकत टॉप २ मध्ये आपले स्थान निश्चित करणे सहज सोपे झाले आहे.