Join us

आधी बुमराह; मग रिचर्ड ग्लीसन! दोन परफेक्ट यॉर्करवर MI च्या बाजूनं फिरला सामना (VIDEO)

साई सुदर्शन अन् वॉशिंग्ट जोडी फोडणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्यावर हार्दिक पांड्या थेट बुमराकडे वळला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 02:19 IST

Open in App

IPL 2025 Eliminator  Jasprit Bumrah And Richard Gleeson Game Changers For MI : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील एलिमिनेटरच्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या संघाने बॅटिंग बॉलिंगमधील दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सचा खेळ खल्लास करत क्लॉलिफायर २ चं तिकीट पक्के केले. फायनल गाठण्यासाठी आता त्यांच्यासमोर पंजाब किंग्जचा अडथळा पार करावा लागणार आहे. बेअरस्टो-रोहितनं पावरप्लेमध्ये दाखवलेली पॉवर अन् बॅटिंगला मैदानात उतरलेल्या प्रत्येकाने कडक खेळी केल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने एलिमिनेटरच्या लढतीत २२८ धावा करत गुजरात टायटन्ससमोर २२९ धावांचे टार्गेट सेट केले होते. ट्रेंट बोल्डनं पहिल्या षटकात मिळवलेली शुबमन गिलची विकेट ही मॅचमधील महत्त्वाची विकेट होती. पण खरा सामना १४ अन् १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर फिरला. आधी बुमराहनं वॉशिंग्टन सुंदरला अप्रतिम यॉर्करवर तंबूत धाडले. त्यानंतर रिचर्ड ग्लीसन याने आपली पहिली आयपीएल विकेट मिळवताना साई सुदर्शनची शिकार केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बुमराहसमोर वॉशिंग्टन सुंदर चारीमुंड्या चीत   

पहिल्या दोन विकेट्स गमावल्यावर साई सुदर्शन याने आपला क्लास दाखवला. त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीनं डावाला नुसता आकार दिला नाही तर गुजरातच्या संघाला सामन्यात आणले होते. ही जोडी मैदानात होती त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचीच नव्हे तर डग आउटमध्ये बसलेल्या सगळ्यांचेच धाबे दणाणले होते. संघ अडचणीत असताना  हार्दिक पांड्या थेट जसप्रीत बुमराहकडे वळला. त्याने पावरप्लेमध्ये २ षटकात १५ धावा खर्च केल्या होत्या. पण यात तो विकेट लेस राहिला होता. १४ व्या षटकात तो आला अन् ४८ धावांवर खेळून गुजरातकडून सुंदर खेळी करणाऱ्या वॉशिंग्टनच्या इनिंगला ब्रेक लावला. बुमराहनं वॉशिग्टनला अप्रतिम यॉर्करवर चकवा देत सेट झालेली जोडी फोडली. बुमराहनं टाकलेला चेंडू एवढा जबरस्त होता की, त्यावर वॉशिंग्टन चारीमुंड्या चीत झाला. तो अक्षरश: जमीनीवर कोसळला अन् त्रिफळाचित होऊन परतला. 

MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)

...अन् मग पिक्चरमध्ये आला  रिचर्ड ग्लीसन

बुमराहनं ही जोडी फोडून सामन्यात ट्विस्ट आणला. मग पिक्चरमध्ये आला. वयाच्या तो कॉर्बिन बॉशच्या रुपात बदली खेळाडूच्या रुपात MI च्या ताफ्यात सामील झालेला इंग्लंडचा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा रिचर्ड ग्लीसन. १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सेट झालेल्या साई सुदर्शन याला त्याने लो फुल टॉस लेंथ चेंडू टाकला. साईनं या चेंडूवर स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला अन् तो फसला. साईनं ४९ चेंडूत ८० धावांची खेळी केली. तो त्रिफळाचित झाला अन् मुंबई इंडियन्सने मॅचवरील पकड अधिक घट्ट केली. मुंबई इंडियन्सने बॅटिंग बॉलिंग दोन्हीत सर्वोत्तम कामगिरी केली. पण या दोन विकेट्समुळेच सामना MI च्या बाजूनं फिरला.   

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेटजसप्रित बुमराहवॉशिंग्टन सुंदरव्हायरल व्हिडिओ