Join us

IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!

विराटची विकेट घेणाऱ्या नवख्या पोरानं आता रोहितला फसवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 20:59 IST

Open in App

IPL 2025 DC vs MI Rohit Sharma Got Dismissed By Vipraj Nigam : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी करून दाखवण्यात अपयशी ठरला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मानं आधी संयम दाखवला. पण दोन-तीन फटके बसल्यावर तो पुन्हा जुन्या मोडमध्ये आला अन् तिथंच तो फसला. रोहित शर्मानं दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १८ धावा केल्या. ही यंदाच्या हंगामातील ५ सामन्यातील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अक्षर पटेलनं हंगाम गाजवणाऱ्या नवख्या पोराच्या हाती चेंडू सोपवला, अन्...

पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेल याने  पॉवरप्लमध्ये फटकेबाजी करण्या तोऱ्यात खेळताना दिसला. पॉवर प्लेमध्ये पाचव्या षटकात अक्षर पटेलनं चेंडू IPLपदार्पणाच्या हंगामात लक्षवेधी कामगिरी करत असलेल्या विपराजच्या हाती सोपवला. या पठ्य़ानंही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. पाचव्या षटकातील सहाव्या चेंजूवर रोहित शर्मा स्वीप मारायला गेला अन् तो लेग स्पिनर विपराज निगमच्या जाळ्यात अडकला. 

अंपायरनं नॉट दिल्यावर KL राहुल पिक्चमध्ये आला, अक्षर पटेलनं DRS घेतला अन् तो यशस्वीही ठरला

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विपराज निगम हा प्रत्येक सामन्यात महत्त्वपूर्ण विकेट्स घेत लक्षवेधून घेताना दिसतोय. याआधी त्याने विराट कोहलीलाही आपल्या जाळ्यात अडकवल्याचे पाहायला मिळाले होते. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात त्याने रोहित शर्माला चकवा दिला. रोहित यष्टीसमोर सापडल्यावर त्याने जोरदार  अपील केल्यावर मैदानातील पंचांनी अपील फेटाळत रोहितला नाबाद ठरवले. मग विकेटमागे उभा असलेला केएल राहुल पिक्चरमध्ये आला. त्याने अक्षर पटेलला रिव्ह्यू घेण्यासाठी मनवले. हा निर्णय दिल्लीच्या बाजूनं आला अन् रोहितच्या इनिंगला ब्रेक लागला. 

५ सामन्यात फक्त ४६ धावा

रोहित शर्मा आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यापासून संघर्ष करताना दिसतो. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याला खातही उघडता आले नव्हते. गुजरात टायटन्स विरुद्ध तो दोन चौकार मारून तंबूत परतला होता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने १३ धावांची खेळी केली. आरसीबी विरुद्धही त्याची गाडी १७ धावांवरच अडखळली होती. पाच सामन्यात त्याच्या खात्यात फक्त ४६ धावा आहेत.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सरोहित शर्मादिल्ली कॅपिटल्सलोकेश राहुलइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट