Join us

IPL 2025 CSK vs MI : 'अनकॅप्ड' धोनी थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार की, 'इम्पॅक्ट'सह छाप सोडणार?

CSK संघ मैदानात उतरला की, एकच ट्रेंड चर्चेत येतो तो म्हणजे धोनी फॉर रीजन. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 03:41 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्जचा संघ एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात करणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार हा मराठमोळा ऋतुराज गायकवाड असला तरी CSK संघ मैदानात उतरला की, एकच ट्रेंड चर्चेत येतो तो म्हणजे थाला फॉर रीजन. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात खेळताना दिसणार धोनी

यंदाच्या हंगामात धोनी अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात मैदानात उतरणार आहे. या गोष्टीमुळे फ्रँचायझी संघ फायद्यात अन् धोनी घाट्यात असाच काहीसा सौदा झाला. पण त्यानं धोनीच्या चाहत्यांमध्ये मात्र काहीच फरक पडणार नाही. उलट फ्रँयायझीच्या भल्यासाठी कमी किंमतीत पुन्हा संघाकडून खेळण्याची हिंमत दाखवल्यामुळे कदाचित त्याच्या चाहत्यांच्या भरच पडेल. धोनी जवळपास ३०३ दिवसांनी आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. सलामीचा सामना त्यात घरचे मैदान म्हणजे संडेची संध्याकाळ ही धोनीमय अशी असेल. त्यात सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यामुळे दोन्ही संघातील या स्पर्धेतील कांटे की टक्कर पाहण्यासाठी मो्ठ्या संख्येनं चाहते धोनीला साथ देण्यासाठी स्टेडियमवर दिसतील.

 थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार की, इम्पॅक्ट प्लेयर होणार?

महेंद्रसिंह धोनी हा चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील एक प्रमुख खेळाडू आहे. तो आणखी काही हंगाम असाच खेळत राहावा, अशी त्याच्या प्रत्येक चाहत्याची इच्छा आहे. नेट्समधील त्याची फटकेबाजी पाहिल्यावर तो आणखी काही हंगाम अगदी  सहज खेळेल, असेही वाटते. पण तो कधी काय निर्णय घेईल त्याचा अंदाज बांधणे कठीणच. अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात मैदानात उतरणाऱ्या धोनीसंदर्भात इम्पॅक्ट प्लेयरचा वापर CSK च्या ताफ्यात कसा होणार? तोही एक चर्चेचा विषय ठरेल. तो थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार की, इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात छाप सोडणार तेही पाहण्याजोगे असेल.

अर्धशतकी खेळी अन् विकेटमागील सर्वोच्च कामगिरीचा डाव साधण्याची संधी

महेंद्रसिंह धोनी हा सध्या ४३ वर्षांचा आहे. आतापर्यंत त्याने विकेटमागे १९० बळी आपल्या खात्यात जमा केले आहेत. जर यंदाच्या हंगामात १० बळी आणखी घेतले तर आयपीएलच्या इतिहासात विकेटमागे द्विशतक झळकवणारा तो पहिला विकेट किपर ठरू शकतो. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तो द्विशतकाच्या किती जवळ जाणार त्यावरही सर्वांच्या नजरा असतील. एवढेच नाही तर एक अर्धशतकासह गिलख्रिस्टचा रेकॉर्ड मोडण्याची संधीही त्याच्याकडे आहे. जर हा डाव मुंबई विरुद्धच्या सामन्यात साध्य झाला तर ती चाहत्यांसाठी एक पर्वणीच असेल. गिलख्रिस्ट हा ४१ वर्षे १४१ दिवस वयात अर्धशतक झळकवणारा आयपीएलमधील सर्वात वयस्क खेळाडू आहे. धोनीला त्याचा हा विक्रमही खुणावतोय. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सटी-20 क्रिकेटइंडियन प्रीमिअर लीग