Join us

BCCI Central Contract : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होणार? जाणून घ्या त्यामागचं कारण

ऋतुराज गायकवाडचे बीसीसीआयच्या आगामी केंद्रीय करार यादीतील स्थान अनिश्चत आहे. कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:34 IST

Open in App

BCCI Central Contract : आयपीएल २०२५ च्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला दिमाखदार विजय मिळवून देणाऱ्या ऋतुराज गायकवाडलाबीसीसीआयकडून मोठा धक्का बसू शकतो. आगामी वार्षिक करारातून (BCCI Central Contract ) मधून त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर येत आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीतून ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होणार?

पीटीआयच्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडचे बीसीसीआयच्या आगामी केंद्रीय करार यादीतील स्थान अनिश्चत आहे. निकषात बसत नसल्यामुळे त्याला कायम ठेवणं कठीण असल्याचा उल्लेख वृत्तामध्ये करण्यात आला आहे. २०२३-२४ च्या बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत त्याला 'क' श्रेणीत स्थान मिळाले होते. ऋतुराज गायकवाड हा अखेरचा आंतरारष्ट्रीय सामना झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळला आहे. 

BCCI Central Contract : अय्यर 'फिक्स'; आयपीएलमधील कॅप्टनसह हे स्टार खेळाडू 'रिस्क' झोनमध्ये

जाणून घ्या त्यामागचं कारण

बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत टिकून राहण्यासाठी खेळाडूंना काही निकष पूर्ण करावे लागतात. एका कॅलेंडर इयरमध्ये तीन कसोटी, आठ एकदिवसीय सामने किंवा दहा टी-२० सामने यापैकी किमान एक निकष पूर्ण करणं गरजेचे असते. ऋतुराज गायकवाड आणि शार्दुल ठाकूर हे दोघेही मागील करार यादीचा भाग आहेत. पण ते हा निकष पूर्ण करू शकलेले नाहीत. याचा या दोघांना फटका बसू शकतो.

श्रेयस अय्यरसह ईशान किशनचीही एन्ट्रीही मानली जातीये फिक्स

मागील हंगामात बीसीसीआच्या करारातून ज्या दोन स्टार खेळाडूंची नावे गायब झाली होती त्यात श्रेयस अय्यरसह इशान किशनचा समावेश होता. या दोघांचा पुन्हा एकदा बीसीसीआयच्या वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीत समावेश होईल, असे बोलले जात आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर त्यांना कोणत्या श्रेणीत ठेवण्यात येणार हा मुद्दाही सध्या चर्चेचा विषय ठरतोय. हे तिघेही सध्याच्या घडीला अ + श्रेणीसह यादीत सर्वात टॉपला आहेत. 

 या युवा खेळाडूंना मिळू शकते संधी

बीसीसीआयच्या आगामी वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीत यशस्वी जैस्वाल, आकाश दीप आणि सरफराज खान सारख्या युवा खेळाडूंना स्थान मिळू शकते. याशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीही करारबद्ध खेळाडूंच्या यादीत दिसू शकतो.

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघऋतुराज गायकवाडइंडियन प्रिमियर लीग २०२५