CSK vs MI Head To Head Record : इथं पाहा IPL मधील दोन यशस्वी संघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात CSK VS MI यांच्यातील लढतीत कोण कुणावर पडलंय भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 04:06 IST2025-03-23T04:04:15+5:302025-03-23T04:06:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Chennai Super Kings vs Mumbai Indians Match 3 Know CSK vs MI Head To Head Record Stats | CSK vs MI Head To Head Record : इथं पाहा IPL मधील दोन यशस्वी संघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड

CSK vs MI Head To Head Record : इथं पाहा IPL मधील दोन यशस्वी संघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेतील सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ एकमेकांविरुद्धच्या लढतीनं  यंदाच्या १८ व्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. या दोन्ही संघात नेहमीच 'कांटे की टक्कर' पाहायला मिळते. त्यामुळे रविवारी रंगणारी ही लढत सुपर संडे ब्लॉकबस्टरच ठरेल. इथं एक नजर टाकुयात पाच वेळच्या दोन IPL चॅम्पियन संघांचा कसा आहे एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मुंबई इंडियन्सच्या संघानं विक्रमी पाच वेळा जिंकलीये IPL ट्रॉफी

मुंबई इंडियन्सच्या संघानं आतापर्यंत २०२३, २०१५ , २०१७, २०१९ आणि २०२० या हंगामात जेतेपद मिळवले आहे. सर्वात आधी सर्वाधिक पाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावे आहे. पाचही हंगामात रोहित शर्मा या  संघाचा कर्णधार होता. नेतृत्व बदलानंतर पुन्हा एकदा ते ट्रॅकवर येण्यासाठी धडपडत आहेत.

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघानं केली त्यांची बरोबरी

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने २०१० मध्ये आपली पहिली ट्रॉफी जिंकली. त्यानंतर २०११ च्या हंगामातही त्याने ट्रॉफीवरील आपला कब्जा कायम ठेवण्यात यश मिळवल्याचे पाहायला मिळाले. २०१८ , २०२१ च्या हंगामानंतर २०२३ मधील जेतेपदासह  या फ्रँचायझी संघाने मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी साधली होती. आता ते षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. धोनीनंतर आता या संघाची मदार ऋतुराज गायकवाडकडे आहे.

CSK VS MI यांच्यात कोण कुणावर पडलंय भारी?

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ३७ सामने खेळवण्यात आले आहेत. यात मुंबई इंडियन्सच्या संघाने २० सामन्यात तर चेन्नईच्या संघानं १७  सामन्यात विजय नोंदवला आहे.  चेन्नई सुपर किंग्जची सर्वोच्च धावसंख्या २१८ धावा असून त्यांची निच्चांकी धावसंख्या ७९ धावा अशी आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाने चेन्नई विरुद्ध २१९ धावांसह सर्वोच्च धावसंख्या उभारली असून १३६ ही  त्यांची निच्चांकी धावसंख्या आहे.

Web Title: IPL 2025 Chennai Super Kings vs Mumbai Indians Match 3 Know CSK vs MI Head To Head Record Stats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.