Join us

IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...

सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:37 IST

Open in App

IPL 2024 Updates : सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला सनरायझर्स हैदराबादकडून दारूण पराभव पत्करावा लागला. हैदराबादने १० गडी राखून विजय मिळवत गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले. आयपीएलमध्ये असलेल्या प्रत्येक  संघाला आपले होम ग्राउंड आहे. यंदाच्या हंगामातील सुरुवातीला तर आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला होता. लखनौचा दारूण पराभव झाल्यानंतर संघाचे मालक संजीव गोएंका कर्णधार लोकेश राहुलवर संतापल्याचे दिसले. (IPL 2024 News) 

लखनौ सुपर जायंट्सच्या फ्रँचायझीचे होम ग्राउंड लखनौ येथील इकाना स्टेडियम आहे. पण, लखनौच्या फ्रँचायझीने लखनौच्या पोलिसांना सुरक्षेसाठी १० कोटी रूपये द्यायचे होते ते अद्याप दिले नाहीत. उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाने देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. अशी माहिती 'भारत समाचार' या वृत्तसंस्थेने दिली. लखनौच्या इकाना स्टेडियमवर आयपीएलचे सात सामने झाले. सुरक्षेची जबाबदारी लखनौ पोलिसांच्या खांद्यावर आहे. एका सामन्यासाठी लखनौच्या फ्रँचायझीला पोलीस विभागाला १.२५ कोटी रूपये द्यावे लागतात. एकूणच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचे हे एका दिवसाचे वेतन असते. 

कायद्यानुसार सामना संपताच लखनौ पोलिसांनी ही रक्कम मिळणे अपेक्षित होते. पण, अद्याप पोलीस कर्मचारी प्रतिक्षेत आहेत. लखनौच्या पराभवानंतर त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मात्र, पोलिसांना अद्याप एकाही सामन्याची रक्कम मिळाली नाही. पोलीस आणि गृहखाते पत्रव्यवहार करण्यात मग्न आहे. या विषयावर लखनौचे पोलीस सहआयुक्त म्हणाले की, लवकरच पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन मिळेल. तर फ्रँचायझीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :लखनौ सुपर जायंट्सआयपीएल २०२४पोलिसउत्तर प्रदेश