Join us

OMG ! रोहित शर्मा Live मॅचमध्ये अचानक प्रचंड घाबरला, प्रसंगच असा घडला, Video 

वानखेडे स्टेडियमवर रोहितच्याच नावाचा गजर दिसला, परंतु हिटमॅनने फलंदाजीत निराश केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 22:15 IST

Open in App

IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मधील घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पकड घेण्यास सुरूवात केली आहे. रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने चाहते नाराज होते. वानखेडे स्टेडियमवर रोहितच्याच नावाचा गजर दिसला, परंतु हिटमॅनने फलंदाजीत निराश केले. या सामन्यात असा एक प्रसंग घडला की रोहित प्रचंड घाबरला... 

इरफान पठाणने अप्रत्यक्षपणे हार्दिक पांड्याला ट्रोल केले; जसप्रीत बुमराहवरून साधला निशाणा

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी आज यजमान मुंबई इंडियन्सला २० षटकांत १२५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. ट्रेंट बोल्टने त्याच्या पहिल्या दोन षटकांत रोहित शर्मा, नमन धीर व इम्पॅक्ट खेळाडू डेवॉल्ड ब्रेव्हिस यांना गोल्डन डकवर माघारी पाठवले. कर्णधार हार्दिक पांड्या ( ३४) व तिलक वर्मा ( ३२) यांनी ५६ धावांची भागीदारी करून डाव सावरला. युझवेंद्र चहलने फिरकीची जादू दाखवली.   बोल्टने ४-०-२२-३ अशी आणि चहलनेही ४-०-११-३ असी उल्लेखनीय स्पेल टाकली. इशान किशन ( १६) व टीम डेव्हिड ( १७) फार काही करू शकले नाही. मुंबई इंडियन्सला ९ बाद १२५ धावा करता आल्या.

 क्वेना मफाकाच्या पहिल्या षटकात यशस्वी जैस्वालने ०,२,०,४,४ असे फटके खेचले. पण, शेवटच्या चेंडूवर मफाकाने यशस्वीला ( १०) बाद केले. RR चा कर्णधार संजू सॅमसन व जॉस बटलर यांनी चांगले फटके मारले. आकाश मढवालच्या चेंडूवर संजू ( १२) दुर्दैवीरित्या बाद झाला. बॅटची किनार घेत चेंडू यष्टींवर आदळला आणि राजस्थानला ४२ धावांवर दुसरा धक्का बसला. दरम्यान, सामना सुरू असताना अचानक प्रेक्षकाने मैदानावर धाव घेतली... अचानक जवळ आलेला प्रेक्षक पाहून रोहित घाबरला आणि दोन-तीन पावले मागे गेला. पण, स्वतःला सावरून नंतर त्याने चाहत्याशी हात मिळवला, मिठी दिली.  

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सरोहित शर्माराजस्थान रॉयल्स