इरफान पठाणने अप्रत्यक्षपणे हार्दिक पांड्याला ट्रोल केले; जसप्रीत बुमराहवरून साधला निशाणा

ट्रेंट बोल्टने त्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा व नमन धीरला गोल्डन डकवर बाद करून MI ला मोठा धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 09:57 PM2024-04-01T21:57:15+5:302024-04-01T21:57:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Not a rocket science to get your best bowler early on. Finally Bumrah with the new ball, Says Irfan Pathan   | इरफान पठाणने अप्रत्यक्षपणे हार्दिक पांड्याला ट्रोल केले; जसप्रीत बुमराहवरून साधला निशाणा

इरफान पठाणने अप्रत्यक्षपणे हार्दिक पांड्याला ट्रोल केले; जसप्रीत बुमराहवरून साधला निशाणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी आज यजमान मुंबई इंडियन्सची अवस्था बेक्कार केली. गोलंदाजांनी कमाल केल्यानंतर RR च्या फलंदाजांनीही दमदार सुरुवात केली. १७ वर्षीय गोलंदाज क्वेन मफायाने पहिल्या षटकात विकेट घेतली असली तरी जॉस बटलर व संजू सॅमसन यांनी चांगला खेळ सुरू ठेवलाय... दरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने जसप्रीत बुमराहवरून MI कॅप्टन हार्दिक पांड्याला ट्रोल केले. 


ट्रेंट बोल्टने त्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा व नमन धीरला गोल्डन डकवर बाद करून MI ला मोठा धक्का दिला. त्यात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या डेवॉल्ड ब्रेव्हिसलाही पहिल्याच चेंडूवर त्याने माघारी पाठवले. कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) तिलक वर्मासह ५६ धावांची भागीदारी करून डाव सावरला, परंतु युझवेंद्र चहलने फिरकीची जादू दाखवली. इशान किशन ( १६) नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर बाद झाला. हार्दिकने २१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. 


तिलक वर्माने ३२ धावा केल्या. बोल्टने ४-०-२२-३ अशी आणि चहलनेही ४-०-११-३ असी उल्लेखनीय स्पेल टाकली. आयपीएलमध्ये सर्वाधिक २० वेळा सामन्यात ३ विकेट्स घेण्याच्या जसप्रीत बुमराहच्या विक्रमाशी चहलने बरोबरी केली. टीम डेव्हिड ( १७) अपयशी ठरला. मुंबई इंडियन्सला ९ बाद १२५ धावा करता आल्या. बर्गरने दोन बळी टिपले. वानखेडेवर २०१८मध्ये सनरायझर्स हैदराबादने ११८ धावांचा यशस्वी बचाव करताना MIला ८७ धावांत गुंडाळले होते. आज तसाच करिष्मा मुंबईला RR विरुद्ध करावा लागणार आहे. 


हार्दिकने पहिलं षटक जसप्रीत बुमराहला न देता क्वेना मफाकाला दिले आणि यशस्वी जैस्वालने ०,२,०,४,४ असे फटके खेचले. पण, शेवटच्या चेंडूवर मफाकाने MI ला पहिले यश मिळवून देताना यशस्वीला ( १०) बाद केले. दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिल्याने इरफान खूश झाला. मागच्या सामन्यात हार्दिकने नवा चेंडू बुमराहला दिला नव्हता त्यामुळे इरफानने नाराजी व्यक्त केली होती. आज त्याने ट्विट केले की, संघातील सर्वोत्तम गोलंदाजाला लवकर बोलावणे यात काही रॉकेट सायन्स नाही... अखेर बुमराहला नवा चेंडू मिळाला... कारण राजस्थान रॉयल्सने कमी धावांत मुंबईला रोखले.  

Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Not a rocket science to get your best bowler early on. Finally Bumrah with the new ball, Says Irfan Pathan  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.