Join us

IPL 2024: "परस्पर आदर, सन्मान असतो पण...", धोनीबद्दल गौतम गंभीरचं मोठं विधान!

MS Dhoni: केकेआरच्या संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 14:24 IST

Open in App

Gautam Gambhir On MS Dhoni: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. अनेक माजी खेळाडू विविध माध्यमातून या स्पर्धेशी जोडले आहेत. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरकोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा मार्गदर्शक आहे. आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारा गंभीर आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल एक मोठे विधान केले आहे. धोनी अद्याप आयपीएल खेळत आहे पण यंदा तो कर्णधार नाही. मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जच्या संघाची धुरा सांभाळत आहे. (Gautam Gambhir News) 

मागील हंगामात गंभीर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक होता. पण यंदाच्या हंगामातून त्याची घरवापसी झाली असून तो पुन्हा एकदा केकेआरच्या संघाशी जोडला आहे. गंभीरने सांगितले की, धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनी ज्या पातळीवर आहे तिथे पोहोचणे खूप कठीण आहे. तीनवेळा आयसीसी ट्रॉफी जिंकणे ही एक मोठी बाब आहे. जेव्हा मी केकेआरचा कर्णधार होतो तेव्हा नेहमीच सीएसकेविरूद्धचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील होतो. मी माझी भूमिका अगदी स्पष्ट मांडतो. परस्पर आदर, सन्मान असतो पण जेव्हा तुम्ही मैदानात एकमेकांविरूद्ध खेळत असता तेव्हा तुम्हाला केवळ जिंकायचे असते. गंभीर 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलत होता. 

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००७ चा ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला होता. यानंतर धोनीच्या नेतृत्वात भारताने २०११ मध्ये वन डे विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. २०१३ मध्ये देखील भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसी ट्रॉफीवर कब्जा करता आला. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००७ चा ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला होता. यानंतर धोनीच्या नेतृत्वात भारताने २०११ मध्ये वन डे विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती.

टॅग्स :गौतम गंभीरमहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सभारतीय क्रिकेट संघ