Join us

IPL 2024 KKR vs PBKS : पावसामुळे पंजाबची बल्लेबल्ले! मुंबई इंडियन्सला टाकले मागे

पंजाबचा संघ टॉप ४ मध्ये पोहचला, कोलकाता नाईट रायडर्सलाही दिलासा मिळाला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 23:31 IST

Open in App

IPL 2024 KKR vs PBKS  Match called Off Due To Rain : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेला सामन्यावर पावसाने पाणी फेरले. पंजाब किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २००१ धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर २०२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कोलकाता संघाची सलामी जोडी मैदानात उतरली. पण  व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या डावातील पहिल्या षटकानंतर पावसाला सुरुवात झाली. खेळ थांबला त्यावेळी कोलकाता संघाने बिन बाद ७ धावा केल्या होत्या. रहमनुल्लाह गुरबाझ १ (३) आणि सुनील नरेन ४ (३) नाबाद खेळत होते. कमीत कमी ५ षटकांचाही खेळ होऊ न शकल्यामुळे अखेर सामना रद्द करण्याची वेळ आली. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला.

एका गुणासह पंजाब फायद्यात! कारण...

या सामन्याआधी पंजाबचा संघ ८ सामन्यातील ५ विजय आणि ३ पराभवासह १० गुण मिळवून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. कोलकाता विरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे पंजाबचा संघ एका गुणाच्या कमाईसह मुंबई इंडियन्सच्या संघाला मागे टाकत  गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबई इंडियन्स  एवढे सामने खेळून आता त्यांच्या एक अतिरिक्त गुण जमा झाला आहे.  मुंबई इंडियन्सशिवाय लखनौच्या संघानेही  ९ सामन्यानंतर १० गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत.  कोलकाता विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे मिळालेल्या एका गुणांसह पंजाबच्या संघाला या दोन्ही संघाच्या एक पाऊल पुढे राहण्याची संधी निर्माण झाली आहे.

PBKS vs KKR : अनकॅप्ड प्रियांश-प्रभसिमरन जोडीची कमाल; मोडला ख्रिस गेल-केएल राहुलचा रेकॉर्ड

कोलकाता नाईट रायडर्स संघालाही या एका गुणासह दिलासा मिळालाय. कारण या आधीच्या सामन्यात सातत्याने त्यांच्या पदरी पराभव पडला होता. खात्यात आणखी एक भोपळा जमा होण्याऐवजी त्यांच्या खात्यात किमान एक गुण जमा झाला आहे. ९ सामन्यानंतर त्यांच्या खात्यात ३ विजय आणि ५ पराभवासह एका अनिर्णित सामन्यासह  ७ गुण जमा झाले आहेत. पण स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना उर्वरित सामने जिंकावे लागतील. ५ सामन्यातील विजयासह ते १७ गुणांपर्यंत मजल मारु शकतील. गत चॅम्पियन संघाला सर्वच्या सर्व सामने जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवूनच मैदानात उतरावे लागेल. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सपंजाब किंग्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेटअजिंक्य रहाणेश्रेयस अय्यर