Join us

रोहित शर्मा बनला 'राजकारणी'! नव्या Videoने वाढवली उत्सुकता; त्यात म्हणतोय, 'पन्नास....'

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास झालेली पाहायला मिळत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 20:06 IST

Open in App

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास झालेली पाहायला मिळत नाही... पहिल्या दोन सामन्यांत हार पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर थरारक विजयाची नोंद केली. १६ एप्रिलला मुंबईचा पुढचा सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध घरच्या मैदानावर होणार आहे. पण, त्याआधी रोहित शर्माचा ( Rohit Sharma) एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओत रोहित राजकारणीच्या रुपात दिसतोय आणि पत्नी रितिका सजदेह त्याच्यामागोमाग आनंदात दिसतेय... हा व्हिडीओ जाहीरातीचा असल्याचे स्पष्ट होतंय आणि यात रोहितसोहत शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर हेही दिसत आहेत.

रोहितने हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे आणि त्यात त्याने, ''पच्चास तोला इंटरटेनमेंट...' असे लिहिले आहे. 

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागील सामन्यात मुंबईने ६ विकेट्स राखून रोमहर्षक विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर ( ५१), अक्षर पटेल ( ५४) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने १७२ धावा केल्या. जेसन बेहरॉनडॉर्फ आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. रिले मेरेडिथनेही दोन बळी टिपले. प्रत्युत्तरात, कर्णधार रोहित शर्मा ( ६५), इशान किशन (३१) आणि तिलक वर्मा ( ४१) यांच्या दमदार खेळानंतरही मुंबईला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. टीम डेव्हिड ( १३*) व कॅमेरून ग्रीन ( १७* ) यांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. १ चेंडूंत २ धावांची गरज असताना टीम डेव्हिडने चतुराईने फटका मारला अन् पळून दोन धावा घेतल्या.

 

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्माशुभमन गिलश्रेयस अय्यरऑफ द फिल्ड
Open in App