RCBच्या चेहऱ्यावर आनंद आला, पण मुंबईचं वाढलं टेंशन; जाणून घ्या केव्हा सुरू होणार सामना 

बंगळुरूत दिवसभर पावसाने थैमान घातल्याने RCB चे टेंशन वाढले होते आणि त्यामुळेच नाणेफेकीला विलंब झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 07:40 PM2023-05-21T19:40:25+5:302023-05-21T19:41:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs GT Live Marathi : Update from Bengaluru, Toss to take place at 7:45 PM IST, Start of Play 8 PM IST | RCBच्या चेहऱ्यावर आनंद आला, पण मुंबईचं वाढलं टेंशन; जाणून घ्या केव्हा सुरू होणार सामना 

RCBच्या चेहऱ्यावर आनंद आला, पण मुंबईचं वाढलं टेंशन; जाणून घ्या केव्हा सुरू होणार सामना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : मुंबई इंडियन्सने विजय मिळवल्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला घरच्या मैदानावर अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवणे भाग असणार आहे. पण, बंगळुरूत दिवसभर पावसाने थैमान घातल्याने RCB चे टेंशन वाढले होते आणि त्यामुळेच नाणेफेकीला विलंब झाला. पण, आता तिथे पाऊस थांबला आहे आणि आयपीएलने मोठे अपडेट्स दिले आहेत. ७.४५ वाजता टॉस होणार असून ८ वाजता मॅच सुरू होणार आहे. 


मुंबई इंडियन्सनेआयपीएल २०२३ च्या अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून Point Table मध्ये चौथे स्थान पटकावले. प्ले ऑफच्या चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात थेट टक्कर आहे. RCBचा अखेरचा साखळी सामना बंगळुरू येथे गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध आहे, परंतु पावसाने खोडा घातल्याने विराट कोहली अँड टीमचे टेंशन वाढले आहे. मुंबईने जरी विजय मिळवला असला तरी त्यांचा नेट रन रेट हा -०.०४४ असा आहे, उलट RCBचा ०.१८० असा आहे. पाऊस थांबला आणि RCB ने विजय मिळवला तर मुंबई स्पर्धेबाहेर होतील.  मुंबईच्या विजयाने मात्र राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले. 

Web Title: IPL 2023, RCB vs GT Live Marathi : Update from Bengaluru, Toss to take place at 7:45 PM IST, Start of Play 8 PM IST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.