IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय मिळवणे महत्त्वाचे आहे, हे माहित असतानाही मुंबई इंडियन्सचा खेळ दर्जाहिन झाला. समाचोलक व माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनीही MIचे कान टोचले. स्पर्धेतून आधीच बाहेर गेलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या फॉर्मात नसलेल्या फलंदाजाने आज MIच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. पहिलाच सामना खेळणाऱ्या २३ वर्षीय फलंदाजासमोर मुंबईचे गोलंदाज हतबल दिसले. आकाश मढवालने ३७ धावांत ४ विकेट्स घेत SRHच्या धावगतीला काहीअंशी वेसण घातले.
SRH ने विवरांत शर्मा व मयांक अग्रवाल ही नवी जोडी सलामीला पाठवली. या जोडीनं सावध खेळ करताना खेळपट्टीवर जम बसवला अन् त्यानंतर मोठे फटके खेचण्यास सुरूवात केली. सूर्यकुमारने चौथ्या षटकात मयांकला रन आऊट करणअयाची सोपी संधी गमावल्याने रोहित शर्मा नाखूश दिसला. जम्मू-काश्मीरमधून आलेल्या २३ वर्षीय विवरांतने ४७ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा चोपल्या. त्याने मयांकसह पहिल्या विकेटसाठी १३.५ षटकांत १४० धावांची यंदाच्या पर्वातील SRHसाठीची सर्वोत्तम भागीदारी केली. मयांकलाही आज चांगला सूर गवसलेला पाहायला मिळाला आणि त्याने मुंबईचा यंदाच्या पर्वातील यशस्वी गोलंदाज पियूष चावला यालाही चोपले. पियूषने ४ षटकांत एकही विकेट न घेता ३९ धावा दिल्या.
आयपीएलमधील अन्य महत्त्वाच्या बातम्या
११ चेंडूंत चोपल्या ४८ धावा! २३ वर्षीय विवरांत शर्माच्या फटकेबाजीने मुंबईला हुडहुडी
ते ७० चेंडू....! मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मार्गाचं अवघड गणित, जाणून घ्या RCBसाठीचं समीकरण
गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपेक्षा चांगला नेट रन रेट करण्यासाठी मुंबईला ११.५ षटकात २०१ धावा कराव्या लागतील.