गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया

Gautam Gambhir Kohli-Kohli Chant viral video : लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने केकेआरचा पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 11:29 AM2023-05-21T11:29:04+5:302023-05-21T11:29:31+5:30

whatsapp join usJoin us
 During KKR vs LSG match in IPL 2023, fans chant Kohli-Kohli in front of Gautam Gambhir, the video of which is going viral  | गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया

गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KKR vs LSG | कोलकाता : लखनौ सुपर जायंट्सने आपल्या नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत देखील प्लेऑफमध्ये धडक मारली. काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्याच घरात पराभूत करून कृणाल पांड्याच्या नेतृत्वातील संघाने ही किमया साधली. गौतम गंभीर आणि विराट कोहली हा संघर्ष क्रिकेट विश्वासाठी नवीन नाही. याचाच प्रत्यय कालच्या सामन्यात पाहायला मिळाला. लखनौच्या संघाचा मार्गदर्शक गंभीरसमोर चाहत्यांनी कोहली-कोहलीचे नारे देऊन त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. गंभीरने देखील हातवारे करत चाहत्यांना प्रत्युत्तर दिल्याचे दिसले.  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यादरम्यान गंभीर आणि कोहली यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. तेव्हापासून लखनौ सुपरजायंट्सचा सामना झाला की, गंभीर आणि नवीन-उल-हकला पाहून चाहते कोहली-कोहली अशा घोषणा देत आहेत. केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान ईडन गॉर्डनमध्येही असेच दृश्य पाहायला मिळाले. 

RCB vs LSG पुन्हा येणार आमनेसामने?
कोलकाताविरूद्धचा सामना जिंकून लखनौच्या नवाबांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एक संघ प्लेऑफमध्ये धडक मारू शकतो. जर बंगळुरूने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले तर पुन्हा एकदा आरसीबी विरूद्ध लखनौ असा रनसंग्राम पाहायला मिळू शकतो. 

लखनौचा निसटता विजय
लखनौ सुपर जायंट्सने केकेआरला १ धावेने नमवून विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने निर्धारित २० षटकांत १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरचा संघ ७ गडी गमावून १७५ धावा करू शकला. रिंकू सिंगने ३३ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी करून चाहत्यांना जागे केले पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. केकेआरला अखेरच्या २ चेंडूमध्ये विजयासाठी १२ धावांची आवश्यकता होती. रिंकूने एक षटकार आणि चौकार ठोकून कडवी झुंज दिली पण केकेआरला १ धावेने पराभव पत्करावा लागला. 

 

Web Title:  During KKR vs LSG match in IPL 2023, fans chant Kohli-Kohli in front of Gautam Gambhir, the video of which is going viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.