Join us

IPL 2023, MI vs RCB Live : ग्लेन मॅक्सवेल-फॅफ ड्यू प्लेसिस यांची तुफान आतषबाजी; कॅच सोडणे MIला महागात पडले

IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : वानखेडे स्टेडियम आज ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Glenn Maxwell and Faf du Plessis) या जोडीने दणाणून सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 21:25 IST

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : वानखेडे स्टेडियम आज ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Glenn Maxwell and Faf du Plessis) या जोडीने दणाणून सोडले. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने १६ धावांवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या २ फलंदाजांना माघारी पाठवले. पण, त्यानंतर मॅक्सवेल व फॅफ यांनी वादळी खेळी केली. चौकार-षटकारांची आतषबाजी करताना दोघांनी ६२ चेंडूंत १२० धावा जोडल्या अन् MIला हैराण केले. पहिल्याच षटकात फॅफचा झेल सोडणे MIला महागात पडले. 

नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?

MIने नाणेफेक जिंकून RCBला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. पहिल्याच षटकात जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर  फॅफ ड्यू प्लेसिससचा झेल नेहाल वढेराकडून झेल सुटला. पण, बेहरनडॉर्फच्या चेंडूवर विराट कोहली ( १)  पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटला घासून यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती विसावला. अनुज रावत ( ६) झेलबाद झाला. १६ धावांवर दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल व फॅफ यांनी तिसऱ्या विकेटसाठी ताबडतोड शतकी भागीदारी केली. MI कडून पहिलाच सामना खेळणाऱ्या ख्रिस जॉर्डनचे दोन खणखणीत षटकात खेचून मॅक्सवेलने स्वागत केले. मागून येऊन मॅक्सवेलने २५ चेंडूंत यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक पूर्ण केले. फॅफनेही ३० चेंडूंत सहावे अर्धशतक पूर्ण केले. 

फॅफ आणि मॅक्सवेल यांनी वानखेडेचा एकही कोपरा फटकेबाजी करून सोडला नव्हता. हे दोघंही मुंबईच्या एकाही गोलंदाजाला जुमानत नव्हते अन् मुंबईच्या घरच्या मैदानावर RCB... RCB चा नारा दुमदुमला... ही जोडी तोडण्यासाठी रोहितने १३व्या षटकात विकेट टेकिंग गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फला आणले आणि त्याचे स्वागतही मॅक्सवेलने चौकाराने केले. पण, तिसरा चेंडू त्याने हवेत उडवला अन् वढेराने सीमारेषेवर सोपा झेल घेतला. मॅक्सवेलने ३३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावा केल्या आणि फॅफसह ६२ चेंडूंत १२० धावांची भागीदारी केली. यंदाच्या पर्वातील मॅक्सवेल व फॅफची ही चौथी अर्धशतकी भागीदारी होती आणि त्यांनी डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो ( २०१९) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. बेहरेनडॉर्फने ४-०-३६-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. 

आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या

अर्जुन तेंडुलकरला ४ सामन्यानंतर Mumbai Indiansने पुन्हा का नाही खेळवलं? जाणून घ्या कारण

रोहित शर्मा आधी संतापला, पण थोड्या वेळाने नाचू लागला; पहिल्या षटकात नाट्य

महिपाल लोम्रोरला ( १) कुमार कार्तिकेयनं त्रिफळाचीत केले. १५व्या षटकात RCBला मोठा धक्का बसला... कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर फॅफने सुपला मारण्याचा प्रयत्न केला अन् ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार खेचून ६५ धावा करणारा फॅफ झेलबाद झाला.  ( पाहा फॅफची विकेट ) इम्पॅक्ट खेळाडू म्हणून केदार जाधव मैदानावर उतरला अन् पहिलाच चेंडू चौकार खेचला. १४ धावांवर कार्तिकचा झेल टाकला आणि त्यानंतर कार्तिक सुसाट सुटला. जॉर्डनलाच कार्तिकची विकेट मिळाली आणि तो १९ चेंडूंत ३० धावांवर झेलबाद झाला. केदार १२ धावांवर नाबाद राहिला अन् वनिंदू हसरंगाने १२ धावा करून संघाला ६ बाद १९९ धावांपर्यंत नेले. 

 

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरग्लेन मॅक्सवेलएफ ड्यु प्लेसीसमुंबई इंडियन्स
Open in App