नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?

IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा नवीन उल हक यांच्यातील वादाची अजूनही चर्चा सुरूच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 08:26 PM2023-05-09T20:26:18+5:302023-05-09T20:26:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs RCB Live Marathi : Naveen Ul Haq really posted this Instagram story after Virat Kohli's wicket? What is he on about?   | नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?

नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा नवीन उल हक यांच्यातील वादाची अजूनही चर्चा सुरूच आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि LSG यांच्यातल्या सामन्यात विराट व नवीन यांच्यात LSGच्या डावातील १७व्या षटकात शाब्दिक वाद झाला होता. त्याचे पडसाद सामन्यानंतर उमटले. RCB ने विजय मिळवल्यानंतर सर्व खेळाडू हस्तांदोलन करत असताना नवीनने किंग कोहलीला खडेबोल सूनावले अन् त्यानंतर मार्गदर्शन गौतम गंभीर याने वादात उडी मारली. विराट व गंभीर असा जोरदार सामना सर्वांनी पाहिला. त्यानंतर सोशल मीडियावरूनही विराट व नवीन असे युद्ध रंगताना दिसतेय... विराटच्या 'आरे'ला नवीन 'कारे'ने उत्तर देतोय... 


LSG vs RCB सामन्यानंतर नेमकं काय घडलं?

  • -  कायले मायर्स विराटसोबत गप्पा मारताना गंभीर तेथे आला अन् LSGच्या फलंदाजाला घेऊन गेला. 
  •  - त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करत असताना वादाची पहिली ठिणगी पडली
  • - LSGचा गोलंदाज नवीन उल हकने विराटसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला अन् काही अपशब्द वापरले

- विराटने तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले अन् हे पाहून नवीन अंगावर धावला, परंतु ग्लेन मॅक्सवेलने त्याला रोखले

  • - हा वाद पाहताच गौतम गंभीर पुन्हा आक्रमक पवित्र्यात गेला अन् दूरूनच विराटवर खवळला
  • - लोकेश राहुलसह लखनौच्या खेळाडूंनी गंभीरला आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विराटपर्यंत पोहोचला
  • - त्यानंतरही विराट शांततेने त्याच्याशी बोलताना दिसला, परंतु गंभीरचा पारा चढाच होता.
  • - पण खरं भांडण जेव्हा नवीन बाद होऊन माघारी जात होता तेव्हाच सुरू झालं होतं.. विराट त्याला काहीतरी म्हणाला होता

 

आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या

अर्जुन तेंडुलकरला ४ सामन्यानंतर Mumbai Indiansने पुन्हा का नाही खेळवलं? जाणून घ्या कारण

रोहित शर्मा आधी संतापला, पण थोड्या वेळाने नाचू लागला; पहिल्या षटकात नाट्य

प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांसमोर विजय हा एकमेव पर्याय आहे.  MIने नाणेफेक जिंकून RCBला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. जोफ्रा आर्चरच्या जागी MIच्या संघात दाखल झालेला ख्रिस जॉर्डन आज पदार्पण करतोय. जेसन बेहरेनडॉर्फच्या फुलटॉस यॉर्कवर फॅफ ड्यू प्लेसिससचा फटका चूकला अन् नेहाल वढेराकडून झेल सुटला. रोहित शर्मा प्रचंड संतापलेला दिसला. बेहरनडॉर्फच्या चेंडूवर विराट कोहली ( १)  पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटला घासून यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती विसावला. 



नवीनची इंस्टा स्टोरी व्हायरल होतेय आणि त्यावर नवीन MI vs RCB मॅच पाहताना दिसतोय आणि तो आंबे खातोय. याचा संदर्भ नेटिझन्सनी विराटच्या विकेटशी जोडला आहे. 


 

Web Title: IPL 2023, MI vs RCB Live Marathi : Naveen Ul Haq really posted this Instagram story after Virat Kohli's wicket? What is he on about?  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.