IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सने ठेवलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने वादळी सुरुवात केली. रोहित शर्मा व इशान किशन यांच्या फटकेबाजीनंतर सूर्यकुमार यादवने चांगला खेळ केला. त्याचा फॉर्म परतल्याने MIचे चाहते आनंदीत झाले. तिलक वर्मा, टीम डेव्हिड यांनीही चांगला खेळ केला. अर्जुन तेंडुलकरने पदार्पणात चांगली कामगिरी करत २ षटकांत १७ धावा दिल्या.इम्पॅक्ट खेळाडू म्हणून रोहित शर्मा मैदानावर आला. इशान किशन व रोहित ( २०) यांनी उत्तुंग फटके मारून पॉवर प्लेमध्ये ७२ धावांचा डोलारा उभा केला. KKRचा इम्पॅक्ट प्लेअर सुयश शर्मा याचे रोहितने षटकाराने स्वागत केले, परंतु पाचव्या चेंडूवर सुयशने विकेट घेतली. उमेश यादवने अफलातून झेल घेतला.
नितीश राणाने पातळी सोडली, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अत्यंत घाणेरडी शिवी दिली
आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितने नावावर केला. त्याने KKR विरुद्ध १०४० धावा करताना शिखर धवनचा ( १०२९ वि. CSk) विक्रम मोडला. वरुण चक्रवर्थीने MIला मोठा धक्का देताना इशानला ५८ ( २५ चेंडू, ५ चौकार व ५ षटकार) धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. इशानने आयपीएलमध्ये २००० धावांचा टप्पा आजच्या सामन्यात गाठला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"