IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : डेव्हिड वॉर्नरला अखेर उप कर्णधार अक्षर पटेलची साथ मिळाली आणि दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी + भागीदारी करताना मुबंई इंडियन्सची डोकेदुखी वाढवली. त्यात MI चा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. 
डावा' डेव्हिड वॉर्नर बनला 'उजवा', रोहित शर्माही चक्रावला; दिल्लीच्या फलंदाजांची कर्णधाराला टांग
![]()
रोहित शर्माने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. DCचा ओपनर पृथ्वी शॉ ( १५) चौथ्या षटकात हृतिक शोकीनच्या फिरकीवर फसला. त्यानंतर आलेल्या मनिष पांडेने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला चांगली साथ देताना ४३ धावांची भागीदारी केली होती, परंतु त्याचाही संयम ९व्या षटकात तुटला. पीयुष चावलाने DCच्या पांडेला ( २६) बाद केले. पीयुषने दुसरी विकेट घेताना रोव्हमन पॉवेलला ४ धावांवर पायचीत केले आणि दिल्लीचे चार फलंदाज ८६ वर माघारी परतले. पीयुषने दिल्लीला आणखी एक धक्का देताना ललित यादवची ( २) विकेट घेतली. पीयुषने २२ धावांत ३ विकेट घेताना आपला अनुभव दाखवून दिला.
वॉर्नर मागील दोन सामन्यांप्रमाणे आजही एकाबाजूने खिंड लढवताना दिसला. अक्षर पटेल आणि वॉर्नर असे दोन डावखुरे फलंदाज मैदानावर असल्याने रोहितने ऑफ स्पीनर तिलक वर्माला गोलंदाजीला आणले. अक्षरने सलग दोन षटकार खेचून शोकीनचे स्वागत केले. वॉर्नरने आणखी एक अर्धशतक पूर्ण करताना संघासाठी किल्ला लढवला. 
मुंबई इंडियन्सविरुद्धचे त्याचे हे ७वे अर्धशतक ठरले आणि त्याने सुरेश रैनाच्या विक्रमाशी बरोबरी केली. ३५ धावांवर अक्षरचा सोपा झेल सूर्यकुमार यादवने टाकला अन् रोहित निराश झाला. त्यावेळी सूर्याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आणि त्या मैदान सोडावे लागले. चेंडू त्याच्या डाव्या डोळ्याच्या बरोबर वरच्या बाजूला आदळला.