IPL 2023 GT vs SRH Live : गुजरात टायटन्स Play Offs मध्ये; सनरायझर्स हैदराबादचे पॅक अप

IPL 2023, Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Marathi : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 11:15 PM2023-05-15T23:15:05+5:302023-05-15T23:23:34+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 GT vs SRH Live Marathi : Gujarat Titans beat Sunrisers Hyderabad & Qualified for Playoffs; Shubman Gill shine with century | IPL 2023 GT vs SRH Live : गुजरात टायटन्स Play Offs मध्ये; सनरायझर्स हैदराबादचे पॅक अप

IPL 2023 GT vs SRH Live : गुजरात टायटन्स Play Offs मध्ये; सनरायझर्स हैदराबादचे पॅक अप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Marathi : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. गतविजेत्यांनी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजयाची नोंद केली. शुबमन गिलच्या ( Shubman Gill) शतकी खेळीनंतर मोहम्मद शमी ( ४-२१) आणि मोहित शर्मा ( ४-२८ ) यांनी SRHचा डाव गुंडाळला. SRHचे आव्हान संपुष्टात आले.  

शुबमन गिलच्या ( Shubman Gill) शतकी खेळीनंतरही गुजरातला सन्मानजनक धावसंख्या उभारता आल्या नाही. त्याने ५८ चेंडूंत १३ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावा केल्या. साई सुदर्शनने ४७ धावा करताना शुबमनसह दुसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली. पण, सुदर्शनच्या विकेटनंतर हैदराबादच्या गोलंदाजानी डोकं वर काढलं. भुवनेश्वर कुमारने २०व्या षटकात तीन विकेट्स घेतल्या आणि त्याने ४-०-३०-५ अशी स्पेल टाकली. गुजरातला त्यांनी ९ बाद १८८ धावांवर रोखले. शुबमन गिलने २०२३ या कॅलेंडर वर्षात वन डे ( २०८ धावा) , कसोटी ( १२८ धावा), आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० ( १२६* धावा) आणि आयपीएलमध्ये ( १०१) शतक झळकावले. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. 

शुबमनच्या फटकेबाजीनंतर मोहम्मद शमीने चेंडू वळवला अन् पॉवर प्लेमद्ये १७ धावांत ३ विकेट्स घेत हैदराबादचा बाजार उठवला. रिंकू सिंगने केलेल्या धुलाईनंतर कमबॅक करणाऱ्या यश दयाल व मोहित शर्मा यांनीही प्रत्येकी १ विकेट घेत हैदराबादचा निम्मा संघ ४५ धावांत तंबूत पाठवला. अनमोलप्रीत सिंग ( ५), अभिषेक शर्मा ( ५), कर्णधार एडन मार्कराम ( १०), राहुल त्रिपाठी ( १) आणि सनवीर सिंग ( ७) हे माघारी परतले. मोहितने पहिल्याच षटकात दुसरी विकेट घेताना अब्दुल समदला ( ४) बाद केले आणि नवव्या षटकात मोहितने आणखी एक विकेट घेताना मार्को यान्सेनला ( ३) माघारी पाठवले. ( मोहम्मद शमीच्या चार विकेट्स पाहा

आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या

CSK ला हरवणे महागात पडले; KKRचा कर्णधार नितीश राणावर कारवाई

पहिला चेंडू पडताच चेन्नईचा पराभव दिसला...?; MS धोनी नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...!

शुबमन गिल विक्रमादित्य! सचिन, विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम

 

हेनरिच क्लासेनने ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावताना भुवनेश्वर कुमारसह SRHसाठी खिंड लढवण्याचा प्रयत्न केला.शमीने SRHची ६८ धावांची भागीदारी करणारी जोडी तोडली. क्लासेन ४४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६४ धावांवर झेलबाद झाला. भुवी २७ धावांवर झेलबाद झाला. नूर अहमदला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावे लागले आणि तेवातियाने २०वे षटक पेकले. हैदराबादल ९ बाद १५४ धावा करता आल्या अन् गुजरातने ३४ धावांनी सामना जिंकला. 

Web Title: IPL 2023 GT vs SRH Live Marathi : Gujarat Titans beat Sunrisers Hyderabad & Qualified for Playoffs; Shubman Gill shine with century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.