Join us

IPL 2023, DC Captain : रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण? पृथ्वी शॉच्या पदरी इथेही निराशा

IPL 2023, DC Captain : भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला अपघातामुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 12:56 IST

Open in App

IPL 2023, DC Captain : भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला अपघातामुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या पर्वात (  IPL 2023) तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट केला. त्यामुळे आयपीएल २०२३मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श आदी नावं या शर्यतीत आघाडीवर आहेत आणि अखेर कर्णधार कोण हे निश्चित झाले आहे. पृथ्वी शॉ सध्या अडचणीत सापडलाय आणि दिल्ली कॅपिटल्सनेही त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी न सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2023, SRH Captain : मयांक अग्रावलचा पत्ता कट; सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व आफ्रिकन खेळाडूच्या हाती 

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) हा रिषभच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. Cricbuzz ने दिलेल्या माहितीनुसार वॉर्नर कर्णधार असेल, तर अक्षर पटेलकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत वॉर्नरच्या कोपऱ्याला दुखापत झाली आणि त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली. तो ऑस्ट्रेलियात रवाना झाला आहे आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी पुन्हा भारतात येणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाला वॉर्नर आयपीएलपर्यंत पूर्णपणे बरा होईल अशी अपेक्षा आहे.  वॉर्नरकडे कर्णधारपद दिल्यानंतर यष्टिंमागे फिल सॉल्ट दिसण्याची शक्यता आहे. उप कर्णधारपदाच्या शर्यतीत रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श यांची नावं चर्चेत होती, परंतु अक्षरने बाजी मारली.   

दिल्ली कॅपटिल्स - रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सडेव्हिड वॉर्नरअक्षर पटेल
Open in App