Anushka Sharma, IPL 2023: मुंबईच्या खेळाडूने झेल सोडताच अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, रिअँक्शन झाली व्हायरल

चेंडू हवेत असेपर्यंत अनु्ष्का एकटक पाहत होती, तितक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 03:36 PM2023-05-10T15:36:50+5:302023-05-10T15:41:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Anushka Sharma reaction goes viral after Mumbai Indians player dropped catch against RCB | Anushka Sharma, IPL 2023: मुंबईच्या खेळाडूने झेल सोडताच अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, रिअँक्शन झाली व्हायरल

Anushka Sharma, IPL 2023: मुंबईच्या खेळाडूने झेल सोडताच अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, रिअँक्शन झाली व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Anushka Sharma Reaction, IPL 2023: आयपीएलच्या 16व्या हंगामातील 54व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मुंबईविरुद्ध 6 विकेट्सने पराभव झाला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 199 धावा केल्या. या सामन्यात संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली अवघी एकच धाव करू शकला. त्यामुळे त्याला पाठिंबा देण्यासाठी आलेली त्याची पत्नी अनुष्का शर्मा चांगलीच निराश झाली. RCBच्या इनिंगमध्ये अनुष्काने एकदा तिच्या सीटवरून उडी मारून एक्स्प्रेशन दिली. तो प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई-बंगलोर सामन्यात दिनेश कार्तिकचा कॅमेरून ग्रीनने सोपा झेल सोडला. कार्तिकचा हा शॉट जोपर्यंत हवेत होता तोपर्यंत अनुष्का खूपच तणावात दिसत होती पण झेल चुकताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या सामन्यात दिनेश कार्तिकने 18 चेंडूत 30 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकारही लगावला. पाहा अनुष्काची रिएक्शन-

फॅफ आणि मॅक्सवेलने केली फटकेबाजी

दिनेश कार्तिकशिवाय कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही फलंदाजीत RCB कडून दमदार फलंदाजी केली. फाफ डू प्लेसिसने 41 चेंडूत 65 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. ग्लेन मॅक्सवेलची खेळी खूपच स्फोटक होती. मॅक्सवेलने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने अवघ्या 33 चेंडूत 68 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय केदार जाधव आणि वानिंदू हसरंगा हे 12-12 धावा करून नाबाद राहिले.

मुंबईच्या विजयात 'सूर्या' तळपला

आरसीबीचे फलंदाज तुफान खेळले त्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनीही चांगलाच धुमाकूळ घातला. विशेषत: सूर्यकुमार यादवची खेळी उत्कृष्ट होती. त्याने अवघ्या 35 चेंडूत 83 धावा केल्या. सूर्यकुमारनेही आपल्या खेळीत 7 चौकार आणि 6 षटकार मारले. सूर्यकुमार शिवाय नेहल वढेरानेही मुंबईसाठी शानदार 52 धावा केल्या. आपल्या डावात वढेराने 34 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार व 3 षटकार लगावले.

Web Title: IPL 2023 Anushka Sharma reaction goes viral after Mumbai Indians player dropped catch against RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.