IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: केन विलियम्सला ( Kane Williamson) ची वादग्रस्त विकेट वगळल्यास आयपीएल २०२२मधील आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) निर्विवाद वर्चस्व गाजवले. संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर RRने सनरायझर्स हैदराबादसमोर ( Sunrisers Hyderabad) विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य ठेवले. पण, त्यानंतर RRचे गोलंदाज युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal), प्रसिद्ध कृष्णा व आर अश्विन यांनी चांगली कामगिरी केली. SRHचा निम्मा संघ ३७ धावांवर माघारी पाठवून RRने विजय पक्का केला आणि नंतरचा खेळ केवळ औपचारिक ठरला. आयपीएल २०२२मध्ये धावांचा बचाव करून विजय मिळवणारा RR हा पहिलाच संघ ठरला.
राजस्थान रॉयल्सकडून ( Rajasthan Royals) १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) आतषबाजीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. जोस बटलर ( Jose Buttler ) व यशस्वी जैस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर संजू व देवदत्त पडिक्कल यांची फटकेबाजी सनरायझर्स हैदराबादसाठी ( Sunrisers Hyderabad ) डोकेदुखी ठरली. संजूने तर ८ चेंडूंत ४२ धावा चोपून RRला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. शिमरोन हेटमायरनेही तुफान फटकेबाजी करून राजस्थानची धावसंख्या दोनशेपार नेली.
NO Ball मुळे जीवदान मिळालेल्या जोस बटलर व यशस्वी जैस्वाल SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी ६ षटकांत ५८ धावा जोडल्या. यशस्वी ( २०) ७व्या षटकाच्या रोमारिओ शेफर्डच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बटलरने ३५ धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) अन् देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal ) यांनी धावांचा पाऊस पाडला आणि ४१ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली. देवदत्त २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांवर त्रिफळाचीत झाला. पण, संजूने फटकेबाजी सुरूच ठेवली. तो २७ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. शिमरोन हेटमायर व रियान पराग यांनीही हात साफ करताना RRला ६ बाद २१० धावांपर्यंत मजल मारून दिली. हेटमायरने १३ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३३ धावा चोपल्या.