Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : सलग दोन चौकार खेचणाऱ्या रॉबिन उथप्पाशी Avesh Khan असा वागला, CSKचा खेळाडू थोडक्यात वाचला

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card: मोईन अलीच्या पुनरागमनाने  CSKची ताकद वाढली. रॉबिन उथप्पाने ( Robin Uthappa) षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत चौकार खेचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:52 PM2022-03-31T19:52:52+5:302022-03-31T19:59:21+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Robin Uthappa starts the innings with a two boundary and Perfect bouncer by Avesh Khan; Ruturaj Gaikwad is run out for just 1 | Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : सलग दोन चौकार खेचणाऱ्या रॉबिन उथप्पाशी Avesh Khan असा वागला, CSKचा खेळाडू थोडक्यात वाचला

Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : सलग दोन चौकार खेचणाऱ्या रॉबिन उथप्पाशी Avesh Khan असा वागला, CSKचा खेळाडू थोडक्यात वाचला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : तीन बदलांसह चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) चा संघ आज लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) सामना करण्यासाठी मैदानावर उतरला. मोईन अलीच्या पुनरागमनाने  CSKची ताकद वाढली. रॉबिन उथप्पाने ( Robin Uthappa) षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत चौकार खेचले. त्यामुळे LSGचा गोलंदाज आवेश खान ( Avesh Khan) चिडला आणि त्याने चौथा चेंडू बाऊन्सर टाकला. या चेंडूचा अंदाज उथप्पाला घेता आला नाही आणि तो त्याच्या हेल्मेटवर आदळला. आवेशच्या या बाऊन्सरने काही काळ CSKच्या ताफ्यात चिंतेचे वातावण होते. पण, उथप्पा पुन्हा उभा राहिला. आवेशने पुन्हा सहावा चेंडू बाऊन्सर टाकला, परंतु यावेळेस उथप्पा तो चकवण्यात यशस्वी ठरला. CSKला बायच्या चार धावा मिळाल्या.

 
 

  • चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्रसिंग  धोनी, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियसही , मुकेश चौधरी, तुषार देशपांडे 
  • लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल, क्विंटन डी कॉक, कृणाल पांड्या, एव्हिन लुईस, मनिष पांडे, दीपक हुडा, आयुश बदोनी, आवेश खान, अँण्ड्य्रू टाय, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमिरा 

 

उथप्पाची फटकेबाजी सुरूच होती, परंतु ऋतुराज गायकवाड लगेच बाद झाला. अँड्य्रू टायच्या गोलंदाजीवर धाव घेण्यासाठी ऋतुराजने क्रिज सोडली, परंतु उथप्पाने त्याला माघारी पाठवले. तोपर्यंत रवी बिश्नोईने चपळाईने क्षेत्ररक्षण करताना ऋतुराजला रन आऊट केले. 

 
 

Web Title: IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Robin Uthappa starts the innings with a two boundary and Perfect bouncer by Avesh Khan; Ruturaj Gaikwad is run out for just 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.