IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) धावला... रोहित शर्मा व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्यानंतर पुढील २९ धावांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे बिनबाद ५० वरून मुंबईची अवस्था ६ बाद ७९ अशी झाली. सूर्यकुमार यादवचे आगमन झाले आणि सामन्याचे चित्रच बदलले... पण, या सामन्यात काळजाचा ठोका चूकणारा प्रसंग घडला. हर्षल पटेलने ( Harshal Patel) टाकलेला फुल टॉस थेट सूर्यकुमारच्या छातीवर आदळला आणि सर्वांचं टेंशन वाढलं. पण, RCBने मात्र विकेटची अपील करून DRS घेतला.
फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकून
मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. रोहित ( २६) व इशान ( २६) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. वनिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेताना डेवॉल्ड ब्रेव्हिस व किरॉन पोलार्ड यांना पायचीत पकडले. तिलक वर्मा घाई करण्याच्या नादात रन आऊट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने ७व्या विकेटसाठी जयदेव उनाडकतसह ४१ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३६ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ६८ धावा चोपल्या. जयदेव १३ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी मुंबईला ६ बाद १५१ धावांपर्यंत पोहोचवले.
१७.१ षटकात काय घडले?
हर्षल पटेलने टाकलेला स्लोव्हर फुल टॉस सूर्यकुमारच्या छातीवर आदळला आणि बंगळुरूने अपील केले. त्यांनी DRS घेतला अन् त्यात सूर्यकुमार नाबाद ठरला.