Join us

IPL 2021: ‘प्लेअर ऑफ वीक’साठी तीन मुंबईकरांमध्ये लागली चुरस, तुमचं मत कुणाला?

IPL 2021, Mumbai Indians: लढवय्या खेळ केलेल्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सला धक्का देताना त्यांच्या हातातील सामना हिसकावून नेला. यासह यंदाच्या सत्रातील गुणांचे खाते उघडताना मुंबईने आपला पहिला विजयही नोंदवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 17:19 IST

Open in App

मुंबई : लढवय्या खेळ केलेल्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सला धक्का देताना त्यांच्या हातातील सामना हिसकावून नेला. यासह यंदाच्या सत्रातील गुणांचे खाते उघडताना मुंबईने आपला पहिला विजयही नोंदवला. या शानदार विजयासह मुंबईकर खेळाडूंचे कौतुक होत असताना आपल्या खेळाडूंना मेहनतीचे फळ देण्याचे मुंबई इंडियन्सने ठरवले आहे. प्रत्येक आठवड्यात चमकणाऱ्या खेळाडूला मुंबई इंडियन्स प्लेअर ऑफ वीक पुरस्काराने गौरविणार असून यासाठी चाहत्यांना वोटिंग करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्लेअर ऑफ मंथ या पुरस्काराच्या धर्तीवर मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाडूंसाठी प्लेअर ऑफ वीक असा पुरस्कार सुरु केला आहे. याबाबत त्यांनी आपल्या वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन माहितीही दिली आहे. त्यानुसार या पहिल्या आठवड्यातील पहिल्या पुरस्कारासाठी तीन खेळाडूंना नामांकन मिळाले असून यामध्ये सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या आणि राहुल चहर यांचा समावेश आहे.

सूर्यकुमारने दोन्ही सामन्यात मुंबईसाठी सातत्यपूर्ण फलंदाजी केली. त्यात कोलकाताविरुद्ध झळकावलेले अर्धशतक निर्णायक ठरले होते. त्यामुळे सूर्याचे नाव या पुरस्कारासाठी आघाडीवर असल्याचे मानले जाते. दुसरीकडे, कृणालनेही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केली असून कोलकाताविरुद्ध त्याने ४ षटकांत केवळ १३ धावाचे दिल्या होत्या. राहुलने तर कोलकाताविरुद्धचा सामना फिरवण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने दबावाच्या क्षणी कोलकाताचे ४ खंदे फलंदाज बाद करत सामना मुंबईच्या बाजूने फिरवला होता. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंची कामगिरी पाहता पहिल्याच पुरस्कारासाठी तगडी स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :मुंबई इंडियन्ससूर्यकुमार अशोक यादवक्रुणाल पांड्याआयपीएल २०२१