ठळक मुद्दे९ एप्रिलपासून सुरू होणार आयपीएलचा चौदावा हंगामसलग तिसऱ्यांदा आयपीएलचं विजेतेपद जिंकण्याची मुंबई इंडियन्सला संधी
लवकरच आता IPL च्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या जर्सीचा व्हिडीओ जारी केला आहे. फ्रेन्चायझीनं या नव्या जर्सीमध्ये निळ्या आणि सोनेरी रंगावर अधिक भर दिला आहे.
आतापर्यंत पाच वेळा मुंबई इंडियन्सनंआयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. गेली दोन वर्षे मुंबई इंडियन्सनं सतत विजेतेपद पटकावलं आहे. यावर्षी सलग तिसऱ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे आहे. दरम्यान, नव्या जर्सीच्या लाँचनंतर मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्यांनी याबबात माहिती दिली. "प्रत्येक वर्षी आम्ही मुंबई इंडियन्सचा वारसा पुढे नेत आहोत, जो आमची मूल्ये आणि विचारधारेवर आधारित आहे. आम्ही पाचवेळा मिळवलेलं विजेतेपद या मूल्यांप्रती आम्ही कटिबद्ध असल्याचं दाखवतो," असं त्यांनी नमूद केलं.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रॉयल चॅलेन्जर्स बँगलोरसोबत ९ एप्रिल रोजी संध्याकाळी होणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा लीगमधील अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्ससह होईल. कोलकात्यातील एडन गार्डनवर हा सामना खेळवला जाईल. मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, क्रिस लिन, सौरभ तिवारी, अनमोलप्रीत सिंह, आदित्य तरे, केरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, राहुल चहर, अनुकूल रॉय, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी, मोहसिन खान, नॅथन कुल्टर नायल, अॅडम माइल, पीयूष चावला, जेम्स निशम, युद्धवीर चारक, मेकरो जेनशन, अर्जुन तेंदुलकर यांचा समावेश आहे.