Join us  

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या स्फोटक फलंदाजानं घेतला क्रिकेटमधून ब्रेक; डॉक्टरांनी दिला सल्ला

Quinton de Kock break from cricket कोरोना नियमांमुळे खेळाडूंना बायो-बबलच्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागत आहे. एका बायो-बबलमधून दुसऱ्या असं सातत्यानं होत असल्यानं क्रिकेटपटूंच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होताना जाणवत आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: February 17, 2021 9:31 AM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे अनेक दिवस क्रिकेट मालिका स्थगित झाल्या होत्या. पण, आता हळुहळू क्रिकेट दौरे सुरू झाले आहेत, परंतु कोरोना नियमांमुळे खेळाडूंना बायो-बबलच्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागत आहे. एका बायो-बबलमधून दुसऱ्या असं सातत्यानं होत असल्यानं क्रिकेटपटूंच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होताना जाणवत आहेत. बायो-बबल हे मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्स ( MI) आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) यानं काही आठवडे क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ( Quinton de Kock will be taking break from cricket ) महेंद्रसिंग धोनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला असता; पण, न खेळण्यास कारण ठरला सचिन तेंडुलकर

डॉक्टरांनी सल्ला दिल्यानं डी कॉकनं हा निर्णय घेतल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेटर्स असोसिएशनचे सीईओ अँड्य्रू ब्रित्झके यांनी सांगितले.  ''वैद्यकिय सल्ल्यानंतर क्विंटन डी कॉकनं काही आठवड्यांसाठी ब्रेक घेतला आहे. या काळात दक्षिण आफ्रिका क्रिकेटर्स असोसिएशन आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका त्याच्या पाठिशी उभे राहणार आहोत,''असे ब्रित्झके यांनी सांगितले. 

बायो-बबलमध्ये राहणे किती आव्हानात्मक आहे, याबाबत डी कॉकनं गेल्या महिन्यात त्याचं मत मांडलं होतं. बायो-बबल म्हणजे मानसिक कसोटीच आहे, असेही तो म्हणाला होता आणि या परिस्थितीशी जुळवण्याचा प्रयत्नही करत असल्याचे त्यानं सांगितलं होतं. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून तो विविध बायो-बबलमध्येच राहत आहे. ऑगस्टमध्ये युएईत झाल्या IPL 2020नंतर  तो इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यावर गेला. त्यानंतर आता पाकिस्तान दौरा.. World Test Championship final scenarios : टीम इंडियाची गरूड भरारी, इंग्लंडला दुहेरी धक्का; मोडले गेले अनेक विक्रम!

''बायो-बबलमध्ये अनेक गोष्टी डोक्यात घर करू लागतात... ज्या गोष्टींचा आयुष्यात कधी विचारही केला नव्हता, अशा लहानलहान गोष्टींबाबतही विचार करू लागतो. एक दिवस आपण सामान्य आयुष्य जगत असतो आणि पुढच्या दिवशी लॉकडाऊन होतो. मग, अशा परिस्थिती आपण कुठे जाणार?,''अशी भावना त्यानं व्यक्त केली. तो पुढे म्हणाला,''बायो-बबलमध्ये आम्ही अडकलो आहोत आणि लॉकडाऊनमध्ये काही काळासाठी आम्ही कुठे तरी अडकून पडू शकतो. तुम्ही सुरक्षित आहात, असे जाहीर होईपर्यंत एका रुममध्येच राहणे, ही मानसिक कसोटी पाहणारं आहे. हे असं किती काळ चालेल, याची कल्पना नाही, परंतु हे स्वीकारायला हवं.'' 

टॅग्स :क्विन्टन डि कॉकमुंबई इंडियन्सद. आफ्रिका