World Test Championship final scenarios : टीम इंडियाची गरूड भरारी, इंग्लंडला दुहेरी धक्का; मोडले गेले अनेक विक्रम!

ICC World Test Championship final scenariosआर अश्विनच्या ( R Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत मोठ्या विजयाची नोंद केली. इंग्लंडला ४८२ धावांचं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ १६४ धावांत तंबूत परतला. दुसऱ्या डावात अक्षर पटेलनं ( Axar Patel) पाच विकेट्स घेत पदार्पणाचा सामना गाजवला.

India vs England, 2nd Test Day 4: आर अश्विनच्या ( R Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत मोठ्या विजयाची नोंद केली. इंग्लंडला ४८२ धावांचं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ १६४ धावांत तंबूत परतला. दुसऱ्या डावात अक्षर पटेलनं ( Axar Patel) पाच विकेट्स घेत पदार्पणाचा सामना गाजवला.

अक्षर पटेलनं ६० धावांत पाच विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ५३ धावांत ३, तर कुलदीप यादवनं २५ धावांत २ विकेट्स घेत विजयात मोठा हातभार लावला. अश्विननं पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या आणि १०६ धावांची वादळी खेळीही केली होती.

कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा अक्षर हा ९वा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी मोहम्मद निस्सार ( १९३२), वामन कुमार ( १९६१) , सय्यद आबीद अली ( १९६७), दिलीप दोशी ( १९७९), नरेंद्र हिरवानी ( १९८८), अमित मिश्रा ( २००८), आर अश्विन ( २०११), मोहम्मद शमी ( २०१३) यांनी असा पराक्रम केला आहे.

भारतानं हा सामना ३१७ धावांनी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. कुलदीप यादव आणि आर अश्विन यांनी अनुक्रमे २ व ३ विकेट्स घेतल्या. या विजयासह कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) घरच्या मैदानावर सर्वाधिक २१ कसोटी जिंकण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) विक्रमाशी बरोबरी केली.

भारताचा हा पाचवा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी टीम इंडियानं २०१५/१६मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दिल्ली कसोटीत ३३७ धावांनी विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ ३२१ वि न्यूझीलंड, इंदूर २०१६/१७, ३२० वि. ऑस्ट्रेलिया, मोहाली २००८/०९, ३१८ वि. वेस्ट इंडिज, नॉर्थ साऊंड, २०१९, ३१७ वि. इंग्लंड, चेन्नई २०२१ हा असा क्रमांक येतो.

आशिया खंडात कसोटी सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक स्टम्पिंग होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी भारत-इंग्लंड यांच्यात १९५२ व १९८८ मध्ये चेन्नईतच असा विक्रम झाला होता.

घरच्या मैदानावर तीनही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विजय नोंदवणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये विराट कोहलीनं मोहम्म अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली आहे. महेंद्रसिंग धोनी ७३ विजयासह अव्वल स्थानी आहे, तर विराट व अझरुद्दीन यांनी प्रत्येकी ५३ विजय मिळवले आहेत.

या विजयासोबत टीम इंडियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली, तर इंग्लंडची पुन्हा चौथ्या स्थानी घसरण झाली. भारताच्या खात्यात ४६० गुण ( ६९.७ %) आहेत, इंग्लंडच्या खात्यात ४४२ गुण ( ६७.० %) आहेत.

जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी इंग्लंडला आता उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. ३-१ असा विजयच त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून देऊ शकतो. भारतानं ही मालिका जिंकल्यास त्यांचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल. पण ही मालिका २-२ किंवा १-१ अशा बरोबरीत सुटल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करेल.