महेंद्रसिंग धोनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला असता; पण, न खेळण्यास कारण ठरला सचिन तेंडुलकर

Mumbai Indians couldn't buy MS Dhoni Sachin Tendulkar सप्टेंबर २००७ टीम इंडियानं महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2008) लिलावासाठी चुरस रंगली.

सप्टेंबर २००७ टीम इंडियानं महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2008) लिलावासाठी चुरस रंगली.

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) ६ कोटींमध्ये महेंद्रसिंग धोनीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. आता आयपीएलमध्ये सर्वाधिक १५० कोटींची पगार घेणारा धोनी हा पहिलाच खेळाडू आहे.

आयपीएलच्या पहिल्या लिलावात धोनीला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सर्वच फ्रँचायझींमध्ये चुरस रंगली असेल, यात काही शंका नाही. मुंबई इंडियन्सही ( Mumbai Indians) धोनीला त्यांच्या ताफ्यात घेण्यासाठी सज्ज होते आणि त्यासाठी त्यांची पैसा ओतण्याची तयारीही होती.

महेंद्रसिंग धोनीसाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोघांमध्ये चुरस रंगली आणि दोन्ही फ्रँचायझी ९ डॉलरपर्यंत आले आणि मुंबई इंडियन्सनं माघार घेतली.

मुंबई इंडियन्सच्या माघार घेण्यामागे सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) कारण ठरला.... मुंबई इंडियन्सनं सचिनला आयकॉन म्हणून निवडले होते. नियमानुसार फ्रँचायझीतील सर्वाधिक पगार असलेल्या खेळाडूपेक्षा आयकॉन खेळाडूचा पगार हा १५ टक्के अधिक असायला हवा.

त्यामुळे धोनीसाठी अधिक रक्कम मोजले असते तर त्याचा पगार हा तेंडुलकरपेक्षा अधिक झाला असता अन् मुंबई इंडियन्सच्या खात्यात ५ मिलियन डॉलरच शिल्लक होते.

त्यामुळे सचिन तेंडुलकरला रक्कम दिल्यानंतर ते धोनीला घेऊ शकत नव्हते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सनं धोनीला आपल्या ताफ्यात घेतले.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं तीन जेतेपद उंचावली आहेत. तसंच चेन्नईनं १९७ पैकी ११९ सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये १०० विजय मिळवणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

सचिन तेंडुलकरनं २००८-२०११ या कालावधीत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सांभाळले. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईनं २०१० मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु धोनीच्या संघानं त्यांना पराभूत केले.