Join us  

IPL 2021: धोनीचं फलंदाजीऐवजी 'या' गोष्टीकडे जास्त लक्ष; अजित आगरकर स्पष्टच बोलले!

IPL 2021: भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी धोनीच्या फलंदाजीवर महत्वूपर्ण विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 2:09 PM

Open in App

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जनं (Chennai Super Kings) सोमवारी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केला. पण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संथ फलंदाजीवरुन पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

चेन्नई सुपरकिंग्ज संघानं काल वानखेडे स्टेडियमवर दमदार सुरुवात केली होती. सामन्यात चेन्नईच्या संघाला सहजपणे दोनशे धावांचा टप्पा गाठण्याची संधी होती. अखेरची सहा षटकं शिल्लक असताना मैदानात महेंद्रसिंग धोनी उतरला होता. पण धोनीला १७ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. चेन्नईला २० षटकांच्या अखेरीस १८८ धावांवर समाधान मानावं लागलं. 

"होय, मी चुकलो! माझं वय झालंय आणि...", महेंद्रसिंग धोनीनं प्रांजळ मनानं दिली कबुली

भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी धोनीच्या फलंदाजीवर महत्वूपर्ण विधान केलं आहे. धोनी सध्या एक मॅच फिनिशर फलंदाजाच्या भूमिकेकडे कमी आणि संघाचा मेंटॉर आणि यष्टीरक्षक कर्णधार या भूमिकेकडे जास्त लक्ष देतोय, असं मत अजित आगरकर यांनी व्यक्त केलं आहे. 'ईएसपीएन क्रिक इन्फो'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (IPL 2021 MS Dhoni looking to play as a wicketkeeper and mentor more than a batsman says Ajit Agarkar)

लोकेश राहुलच ठरतोय पंजाबच्या पराभवास जबाबदार? असं कसं? जाणून घ्या...

आयपीएलच्या यंदाच्या सीझनला आताच सुरुवात झाली आहे. त्यामुळे धोनीच्या फलंदाजीबाबत एवढ्यातच ठाम मत व्यक्त करणं चुकीचं देखील ठरू शकतं. पण संघात खालच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याचा धोनीचा निर्णय नक्कीच आश्चर्यकारक आहे, असंही आगरकर म्हणाले. 

"धोनी कदाचित संघाचा मॅच फिनिशर फलंदाजापेक्षा मेंटॉर आणि एक यष्टीरक्षक कर्णधार या भुमिकेकडे जास्त लक्ष देतोय. पण स्पर्धेला आताच सुरुवात झालीय. त्यामुळे इतक्यातच काही बोलणं योग्य ठरणार नाही. पुढील दोन ते तीन सामन्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. पण संघाला धावांची गरज असताना धोनीनं सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणं हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं", असं आगरकर म्हणाले. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे गेला बराच काळ तो क्रिकेटपासून दूर आहे म्हणून तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येणं स्वीकारात असेल अशी शक्यता देखील आगरकर यांनी व्यक्त केली. 

चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये धोनीनं संघात सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला होता. तर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातही तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि १७ चेंडूत १८ धावा करु शकला. यात दोन चौकारांचा समावेश होता.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्स