IPL 2021: लोकेश राहुलच ठरतोय पंजाबच्या पराभवास जबाबदार? असं कसं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 01:13 PM2021-04-20T13:13:41+5:302021-04-20T13:16:58+5:30

IPL 2021: मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि कर्णधार लोकेश राहुल (KL Rahul) यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही पंजाबला पराभवास सामोरे जावे लागले होते.

IPL 2021 Lokesh Rahul is responsible for Punjab defeat here is the reason | IPL 2021: लोकेश राहुलच ठरतोय पंजाबच्या पराभवास जबाबदार? असं कसं? जाणून घ्या...

IPL 2021: लोकेश राहुलच ठरतोय पंजाबच्या पराभवास जबाबदार? असं कसं? जाणून घ्या...

Next

पंजाब किंग्स संघाची फलंदाजी अत्यंत मजबूत असली, तरी त्यांना अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात पूर्ण यश आलेले नाही. रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १९५ धावा फटकावल्यानंतरही पंजाबला पराभव पत्करावा लागला होता. मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि कर्णधार लोकेश राहुल (KL Rahul) यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही पंजाबला पराभवास सामोरे जावे लागले होते. (IPL 2021 Lokesh Rahul is Responsible For Punjab Defeat Here Is The Reason)

"होय, मी चुकलो! माझं वय झालंय आणि...", महेंद्रसिंग धोनीनं प्रांजळ मनानं दिली कबुली

सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत लोकेश राहुल अव्वल पाचमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. एक फलंदाज म्हणून तो नक्कीच यशस्वी ठरत आहे, मात्र त्याची खेळी पंजाबच्या पराभवास कारणीभूतही ठरत आहे. हे आम्ही नाही, तर आकडेवारी सांगत आहेत.  

सर रवींद्र जडेजा कॅच घेण्यासाठी धावत नाहीत, तर...; महेंद्रसिंग धोनीचं ८ वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही कुठेना कुठे राहुलची खेळी जबाबदार ठरली आहे. दिल्लीविरुद्ध राहुलने ५१ चेंडूंत ६१ धावा केल्या. म्हणजेच संपूर्ण १२० चेंडूंपैकी ५१ चेंडू एकट्या राहुलने खेळले, ४२ टक्के इतके आहे. मात्र, यामध्ये राहुलने केवळ ७.१७ च्या रनरेटने धावा फटकावल्या. टी-२० क्रिकेटसाठी हा रनरेट नक्कीच चांगला नाही. याचा मोठा परिणाम सामन्यावर झाला. यामुळे पंजाबला दमदार सुरुवातीनंतरही २०० धावा पार करण्यात यश आले नाही. राहुल-मयांक यांनी १२.४ षटकांमध्येच संघाला १२२ धावांची जबरदस्त सलामी दिली होती, हे विशेष.

चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video

दुसरीकडे, जेव्हा जेव्हा राहुल अर्धशतक झळकावतो, तेव्हा पंजाब संघाचा पराभव होतो, हेही आकडेवारीवरुन दिसून आले आहे. २०१८ सालानंतर पराभव झालेल्या सामन्यांत सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विक्रम राहुलच्या नावावर आहे. त्याने जेव्हा जेव्हा अर्धशतक झळकावले तेव्हा पंजाबने १० सामने गमावले आहेत. यानंतर सनरायझर्स हैदराबादचा मनीष पांड्ये असून त्याच्या अर्धशतकानंतर हैदराबादने ७ सामने गमावले. मनीषसोबत केन विलियम्सनही आहे आणि त्याच्या अर्धशतकानंतरही संघाने ७ पराभव पत्करले आहेत.

टेम्पो चालकाचा मुलगा, RCBचा नेटबॉलर अन् IPL 2021चा स्टार; चेतन सकारियानं केलीय धोनी, रैना, राहुल यांची शिकार!

विजयी खेळी साकारण्यातही राहुलचे योगदान फारसे चांगले ठरलेले नाही. राहुलने ज्या १६ सामन्यांमध्ये ४०हून अधिक चेंडू खेळले, त्यापैकी पंजाबने ७ सामन्यांत विजय, तर ९ सामन्यांत पराभव पत्करले आहेत. संघाच्या विजयी टक्केवारीत राहुलचे योगदान ४३.७५ टक्के इतकेच आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मात्र राहुल चमकदार ठरला आहे. त्याने ९ सामन्यांमध्ये ४० हून अधिक चेंडू खेळले असून यापैकी ८ वेळा भारताने बाजी मारली आहे, तर केवळ एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 Lokesh Rahul is responsible for Punjab defeat here is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app