IPL 2021, CSK vs RR  T20 : IPL 2021: Ravindra Jadeja Celebrates In Style After Taking 4 Catches vs Rajasthan Royals, Video | IPL 2021, CSK vs RR T20 : चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video

IPL 2021, CSK vs RR T20 : चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ४५ धावांनी विजय मिळवला. CSKच्या ९ बाद १८८ धावांचा पाठलाग करताना RRचा संघ ९ बाद १४३ धावा करू शकला. सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मोईन अलीला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आलं. या सामन्यात जडेजानं चार सुरेख झेल टिपले आणि त्यानंतर त्यानं भन्नाट सेलिब्रेशनही केलं. 

चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) फलंदाजांनी वैयक्तिक कामगिरी उंचावली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. फॅफ ड्यू प्लेसिस ( ३३) , मोईन अली ( २६) , अंबाती रायुडू ( २७) व सुरेश रैना ( १८) यांनी CSKसाठी मजबूत पाया उभारून दिला. ड्वेन ब्राव्होनं ८ चेंडूंत नाबाद २० ( २ चौकार व १ षटकार) धावा करून चेन्नईला ९ बाद १८८ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. चेतन सकारियानं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  

जोस बटलर व मनन वोहरा यांनी RRला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३ चेंडूंत ३० धावा जोडल्या, परंतु सॅम कुरननं वोहराला ( १४) माघारी जाण्यास भाग पाडले. शिवम दुबेनं घरच्या मैदानावर CSKचा पाहुणचार घेतला. ४२ धावांची ही भागीदारी रवींद्र जडेजानं तोडली. जोस बटलर ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात जडेजानं RRचा सेट फलंदाज दुबेलाही ( १७) पायचीत करून माघारी पाठवले.  १५व्या षटकात मोईन अलीनं आणखी दोन धक्के देत CSKचा विजय पक्का केला. राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या.  

पाहा व्हिडीओ...


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, CSK vs RR  T20 : IPL 2021: Ravindra Jadeja Celebrates In Style After Taking 4 Catches vs Rajasthan Royals, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.