Join us  

IPL 2021, MI vs RCB T20 : क्विंटन डी कॉक नाही खेळणार; नव्या भीडूसह मुंबई इंडियन्स तगडी Playing XI मैदानावर उतरवणार!

IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : चेन्नई : जगातील सर्वात लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचा थरार कोरोना प्रकोपात आजपासून रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 4:55 PM

Open in App

IPL 2021Mi vs RCB Live T20 Score : चेन्नई : जगातील सर्वात लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचा थरार कोरोना प्रकोपात आजपासून रंगणार आहे. प्रेक्षकांविना सर्व सामने बायो-बबल्समध्ये खेळविले जातील. सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( MI vs RCB, MI Vs RCB live score)  यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सनं मागील दहा सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ वेळा पराभूत केले आहे. २०११मध्ये MI vs RCB असा सामना रंगला होता आणि तो विराट कोहलीच्या संघानं ४३ धावांनी जिंकला होता. पण, या दोन्ही संघांना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही धक्के बसले आहेत, त्यामुळे आजच्या सामन्यात ते कोणत्या प्लेइंग इलेव्हन ( Playing XI) सह मैदानावर उतरतील याची सर्वांना उत्सुकता आहे.  Mi vs RCB Live Score Updates

क्विंटन डी कॉक पहिल्या सामन्याला मुकणार 

पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका अर्ध्यावर सोडून दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक भारतात दाखल झाला. एका बायो-बबलमधून तो दुसऱ्या बायो-बबलमध्ये थेट दाखल झाला आहे. पण, त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे रोहित शर्मासह आजच्या सामन्यात सलामीला कोण येईल, याची सर्वांना उत्सुकता आहे. मागील संपूर्ण पर्व बाकावर बसून राहिलेल्या ख्रिस लीनला ( Chris Lynn) ला आज संधी मिळू शकते. IPL 2021 MI vs RCB, MI vs RCB Live match आयपीएलचा आनंद लुटा आपल्या 'मायबोली'त; विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, संदीप पाटील यांची 'बोलंदाजी'!

 पीयुष चावला की राहुल चहर? फिरकीसाठी मुंबई इंडियन्ससमोर पीयुष चावला व राहुल चहर असे दोन पर्याय आहेत, परंतु त्यापैकी एकच जण अंतिम ११मध्ये स्थान पक्कं करू शकतो. आयपीएल २०२१च्या लिलावात चावलासाठी २.४ कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले, परंतु त्याला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.   IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात! 

RCB vs MI यांच्यात सर्वाधिक धावा - विराट कोहली यानं मुंबई इंडियन्सविरुद्ध ६९५ धावा चोपल्या आहेत आणि नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( ६३४), किरॉन पोलार्ड ( ५३९) यांचा क्रमांक येतो.  

RCB vs MI यांच्यात सर्वाधिक विकेट्स - हरभजन सिंगनं २२ विकेट्स घेतल्या आहेत. युजवेंद्र चहर आमि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २१ विकेट्स घेतल्या आहेत.  चेन्नई सुपर किंग्सनं खेळला मोठा गेम; मुंबई इंडियन्सच्या माजी गोलंदाजाला घेतलं आपल्या ताफ्यात!

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ ( Mumbai Indians Playing XI vs RCB) - रोहित शर्मा, ख्रिस लीन, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, नॅथन कोल्टर नील

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संभाव्य संघ ( Royal Challengers Bangalore playing XI) - विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनिएल ख्रिस्टीन, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिन्सन, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर