IPL 2021 : आयपीएलचा आनंद लुटा आपल्या 'मायबोली'त; विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, संदीप पाटील यांची 'बोलंदाजी'!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 04:20 PM2021-04-09T16:20:31+5:302021-04-09T16:51:15+5:30

IPL 2021 commentary in Marathi और ये लगा चौकार, गेंद बाऊंड्रीके पार जाती हुई, What a Six.. आतापर्यंत हिंदी, इंग्रजी, तेलुगू आदी भाषांमधेय इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्यांचे समालोचन होत होते.

100 commentators across 8 languages announced for IPL 2021, first time commentary in Marathi  | IPL 2021 : आयपीएलचा आनंद लुटा आपल्या 'मायबोली'त; विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, संदीप पाटील यांची 'बोलंदाजी'!

IPL 2021 : आयपीएलचा आनंद लुटा आपल्या 'मायबोली'त; विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, संदीप पाटील यांची 'बोलंदाजी'!

Next

और ये लगा चौकार, गेंद बाऊंड्रीके पार जाती हुई, What a Six.. आतापर्यंत हिंदी, इंग्रजी, तेलुगू आदी भाषांमधेय इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्यांचे समालोचन होत होते. पण, इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील प्रत्येक सामन्याचा आनंद आपल्या मायबोली मराठीत लुटता येणार आहे. विनोद कांबळी, संदीप पाटील, अमोल मुजुमदार, स्नेहल प्रधान या स्टार सह कुणाल दाते, प्रसन्ना संत व चैतन्य संत हे मराठीतून समालोचन करणार आहेत. मग आता उत्तुंग फटक्यांसह गमतीदार किस्से, कडक चौकारांसह चाबूक विश्लेषण आणि उसळत्या चेंडूंसह मराठी समालोचन ऐकण्याची संधी डिस्ने हॉटस्टारवर मिळणार आहे.  मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात! 

स्टार स्पोर्ट्सनं १४व्या समालोचकांची मोठी टीम जाहीर केली आहे. या स्पर्धेचे समालोचन इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ, मळ्याळम, तेलगू आणि बंगाली भाषेत केले जाणार आहे.  

हिंदी समालोचक - आकाश चोप्रा, निखिल चोप्रा, गौतम गंभीर, अजित आगरकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, आरपी सिंग, दीप दासगुप्ता, सुनील गावस्कर Mi vs RCB Live Score Updates

डगआउट- स्कॉट स्टायरिस, ब्रेट ली, डोमिनिक कॉर्क, ब्रायन लारा, ग्रॅमी स्वान, केव्हिन पीटरसन, शेन वॉटसन, रॉस टेलर, डेल स्टेन आणि नासिर हुसैन  चेन्नई सुपर किंग्सनं खेळला मोठा गेम; मुंबई इंडियन्सच्या माजी गोलंदाजाला घेतलं आपल्या ताफ्यात!

वर्ल्ड फिड टीम- मॅथ्यू हेडन, केव्हिन पीटरसन, मायकल स्लेटर, डॅनी मॉरिसन, इयान बिशप, हर्षा भोगले, सायमन डल, एमबांग्वा, डारेन गंगा, सुनील गावस्कर, मार्क निकोलस, अजित आगरकर, निक नाइटर, दीप दासगुप्तान, रोहन गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, अंजुम चोप्रा, लिसा स्थळेकर, मेल जोस, एलन विक्सि

मनसेचा डिस्ने हॉटस्टारला दिला होता दम...
डिस्ने हॉटस्टारवर भारतातील अन्य भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन केले जाते. यामुळे मराठीतूनही समालोचन केले जावे, यासाठी मनसेने आता थेट डिस्ने हॉटस्टार कंपनीला ऑक्टोबर २०२०मध्ये पत्र पाठवले होते.  आता मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र दिले होते. डिस्ने हॉटस्टारच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अन्य प्रादेशिक भाषांसारखाच मराठी भाषेचाही पर्याय द्यावा, अशी मागणी केली होती. ''आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये केले जाते. मात्र, अॅपमध्ये मराठी नाही. तुमच्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. आयपीएलचा मराठी प्रेक्षक वर्गही मोठा आहे. असे असताना तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे, असे मनसेने म्हटले होते.


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 100 commentators across 8 languages announced for IPL 2021, first time commentary in Marathi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app