IPL 2021, MI vs RCB T20 : मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात! 

IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update MI नं २०१९ व २०२०मध्ये अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स ( CSK) व दिल्ली कॅपिटल्सा ( DC) यांच्यावर विजय मिळवून आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. याआधी मुंबई इंडियन्सनं २०११, २०१३ व २०१५ मध्ये बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 03:45 PM2021-04-09T15:45:27+5:302021-04-09T15:46:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, MI vs RCB T20 : Marathi Ekikaran Samiti criticize on Mumbai Indians, Team not include Marathi language in whatsapp customer care | IPL 2021, MI vs RCB T20 : मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात! 

IPL 2021, MI vs RCB T20 : मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : MI vs RCB  T20 Live Score Update : आयपीएलच्या १४व्या पर्वाची आजपासून सुरूवात होत आहे. पाच वेळा जेतेपद पटकावणारे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनीय सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. यंदाची आयपीएल जिंकून मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) जेतेपदाची हॅटट्रिक खुणावत आहे आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच संघ ठरू शकतो. मुंबईच्या याच स्वप्नाला आजपासून सुरूवात होत असताना नव्या वादालाही तोंड फुटले आहे. मराठी एकीकरण समितीनं एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यावरून मुंबई इंडियन्सवर टीका केलीय... IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score चेन्नई सुपर किंग्सनं खेळला मोठा गेम; मुंबई इंडियन्सच्या माजी गोलंदाजाला घेतलं आपल्या ताफ्यात!

MI नं २०१९ व २०२०मध्ये अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स ( CSK) व दिल्ली कॅपिटल्सा ( DC) यांच्यावर विजय मिळवून आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. याआधी मुंबई इंडियन्सनं २०११, २०१३ व २०१५ मध्ये बाजी मारली. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( MI) पाच जेतेपद पटकावली आहे. चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा, तर कोलकाता नाइट रायडर्सनं दोन वेळा ही कामगिरी केली आहे. MI vs RCB, MI Vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news

नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई इंडियन्सनं क्रिकेटप्रेमींनी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, विविध माहिती मिळण्याकरिता व्हाट्सअॅप क्रमांकावर दिलेल्या भाषांच्या पर्यायात मराठीच नसल्यानं मराठी एकीकरण समितीनं विरोध दर्शवला आहे.  मुंबईची भाषा हिंदी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, असे समितीचं म्हणणं आहे. मराठीला डावलून हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषा दिल्या आहेत. इतर राज्यातील संघ त्या त्या राज्याच्या भाषेत सेवा देत आहेत, त्या संघाचे गाणे सुद्धा त्यांच्याच भाषेत आहेत. पण, महाराष्ट्रातील मुंबई​ संघाचे गाणे मराठी नाही आणि आता तर व्हाट्सअॅपवर संपर्क करण्यासाठी भाषा पर्याय सुद्धा हिंदीच दिला आहे. MI vs RCB IPL match 2021, MI vs RCB T20 Match


मुंबईची भाषा हिंदी आहे हे नकळत किंवा मुद्दामून केलेला प्रकार आहे.  याविषयी मराठी एकीकरण समिती मार्फत संबंधितांना याबद्दल कळवून विरोध केला आणि जाब विचारला गेला. 

Match: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)
Venue: एम.ए.चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai)
Time: उद्या रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी
Where to watch live: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, हॉटस्टार

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग, नॅथन कोल्टर नायर, अॅडम मिल्ने, पीयूष चावला, जेम्स निशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन, अर्जुन तेंडुलकर  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, कायले जेमिन्सन, डॅनिएल ख्रिस्टियन, के एस भारत, सूयश प्रभुदेसाई.

Web Title: IPL 2021, MI vs RCB T20 : Marathi Ekikaran Samiti criticize on Mumbai Indians, Team not include Marathi language in whatsapp customer care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.