Join us  

IPL 2021 : 'पोलार्ड आऊट झाला का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या Live भाषणादरम्यान MI चाहत्यांची चर्चा! 

IPL 2021, MI vs KKR : मुंबई इंडियन्सनं मंगळवारी गमावलेला सामना जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला हार मानण्यास भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 8:15 AM

Open in App

IPL 2021, MI vs KKR : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत राज्यांत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री ८.३० वाजता सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला. पण, त्यांच्या या Live भाषणात लोकं कमेंट बॉक्समध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्याचे अपडेट्स विचारताना दिसले. आयपीएलची क्रेझ किती आहे, हे वेगळं सांगायला नको. त्यात मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह सुरू असताना कमेंट्समध्ये पोलार्ड आऊट झाला का?, अशी विचारणा झाल्यानं सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

मुंबईनं गमावलेला सामना खेचून आणला.. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत ७ विकेट्स गमावल्यानं त्यांचा संपूर्ण संघ १५२ धावांत तंबूत परतला. सूर्या व रोहित शर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यानं ३६ चेंडूंत ७ चौकार  व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. रोहितनं ३२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. कमिन्सनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १५२ धावांवर गडगडला. आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत ५ विकेट्स घेत मुंबईला मोठे धक्के दिले.  मुंबई इंडियन्सनं गमावलेला सामना खेचून आणला; राहुल चहर, ट्रेंट बोल्टनं 'गेम'च फिरवला!

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या KKR साठी नितीश राणा व शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. हा सामना कोलकाता सहज जिंकेल असे वाटत होते. पण, राहुल चहरनं चार विकेट्स घेत सामनाच फिरवला.   नितीशनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या, राहुल चहरनं २७ धावांत चार विकेट्स घेतल्या.  कोलकाताला विजयासाठी अखेरच्या ३६ चेंडूंत ४० धावांची गरज होती. पण, मुंबईच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी करताना संघाला १० धावांनी विजय मिळवून दिला. कृणालनं १३ धावांत १, ट्रेंट बोल्टनं २७ धावांत २ विकेट्स घेतल्या. बुमराहनं २८ धावा दिल्या. 

 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सउद्धव ठाकरे