Join us

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरला येतेय कुटुंबीयांची आठवण; SRHच्या कर्णधाराचे 'बूट' पाहून व्हाल Emotional!

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) बुधवारी आयपीएल २०२१त सनरायझर्स हैदराबादवर ( Sunrisers Hyderabad) ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 08:00 IST

Open in App

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) बुधवारी आयपीएल २०२१त सनरायझर्स हैदराबादवर ( Sunrisers Hyderabad) ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज विजय मिळवला. SRHचे ३ बाद १७१ धावांचा CSKनं १८.३ षटकांत यशस्वी पाठलाग केला. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यानं या पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतली. SRHच्या पराभवानंतर वॉर्नरवर भलेही चाहते नाराज झाले असतील, परंतु एका कृतीनं त्यांच्या मनात वॉर्नरनं जागा नक्की बनवली आहे. आयपीएलच्या या पर्वात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) त्याच्या बुटांवर सामाजिक संदेश देणारे चित्र छापून खेळत आहे. रोहितनंतर आता वॉर्नरच्या बूटांची चर्चा सुरू झाली आहे.  चेन्नई सुपर किंग्सला आता रोखणं अवघड अन् SRHचं पुनरागमन कठीण!

कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( ५७) व मनीष पांडे ( ६१) यांची १०६ धावांची भागीदारी आणि केन विलियम्सन व केदार जाधव यांच्या अखेरच्या षटकांतील फटकेबाजीच्या जोरावर हैदाराबादनं १७१ धावांचा डोंगर उभा केला. केन १० चेंडूंत २६ आणि केदार जाधव ४ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस ( ५६) व ऋतुराज गायकवाड ( ७५) यांनी पहिल्या विकेटसाठी १२९ धावा जोडल्या. रवींद्र जडेजा व सुरेश रैना यांनी CSKचा विजय पक्का केला.  हैदराबादकडून राशिद खाननं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. चेन्नईनं १८.३ षटकांत ७ विकेट्स राखून विजयी लक्ष्य पार केले. 

असं काय आहे त्या बुटांवर?डेव्हिड वॉर्नरनं बुटांवर त्याच्या तीन मुली इव्ही, इंडी व इस्ला यांच्यासह पत्नी कँडी यांचे नाव लिहिले आहे.

 

टॅग्स :आयपीएल २०२१डेव्हिड वॉर्नरसनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्स