IPL 2021, CSK Vs SRH T20 Match Highlight : चेन्नई सुपर किंग्सला आता रोखणं अवघड अन् SRHचं पुनरागमन कठीण!

IPL 2021, CSK Vs SRH T20 Match Highlight : गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) संघ संपला, अशी चर्चा सुरू झाली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 11:25 PM2021-04-28T23:25:38+5:302021-04-28T23:26:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK Vs SRH T20 Match Highlight : 5th consecutive win for CSK in IPL2021, SRH fifth defeat in six match | IPL 2021, CSK Vs SRH T20 Match Highlight : चेन्नई सुपर किंग्सला आता रोखणं अवघड अन् SRHचं पुनरागमन कठीण!

IPL 2021, CSK Vs SRH T20 Match Highlight : चेन्नई सुपर किंग्सला आता रोखणं अवघड अन् SRHचं पुनरागमन कठीण!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, CSK Vs SRH T20 Match Highlight : गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) संघ संपला, अशी चर्चा सुरू झाली. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSK ला प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. पण, सहा महिन्यांत चेन्नईनं असा कोणता करिष्मा केला की आयपीएल २०२१मध्ये सलग पाच सामने जिंकणारा तो पहिला संघ ठरला. सहा महिन्यांपूर्वी १४ सामन्यांत केवळ १२ गुणांची कमाई करणाऱ्या चेन्नईनं आता सहा सामन्यांत १० गुणांची कमाई करताना गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले आहे. ( 12 points from 14 games five months ago, Now sitting at 10 points from 6 games at the top) 

IPL 2021, CSK Vs SRH T20 Match Highlight : 

  • जॉनी बेअरस्टो आज अपयशी ठरल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना सनरायझर्स हैदराबादचा डाव सावरला, परंतु या दोघांच्या धावांची सरासरी ही हैदराबादची चिंता वाढवणारी ठरली.
  • चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना विकेट्स मिळवण्यात अपयश आले असले तरी त्यांनी हैदराबादच्या धावांचा वेग संथ ठेवला होता. केन विलियम्सन व केदार जाधव यांनी अखेरच्या १३ चेंडूंत ३७ धावा जोडल्या नसत्या तर त्यांना कदाचीत १५० धावांवरच समाधान मानावे लागले असते.
  • पराभवानंतर वॉर्नरनं संथ खेळीचा फटका बसल्याचे मान्य केले. मनीष पांडेचा परतलेला फॉर्म ही हैदराबादसाठी जमेची बाजू ठरली, त्याचसोबत केन व केदारची फटकेबाजीनं हैदराबादला पुढील वाटचालीसाठी आशेचा किरण दाखवला आहे. 
  • हैदराबादची पुढील वाटचाल बिकट आहे. सहापैकी पाच सामन्यांत पराभव झाल्यानं ते तळावर आहेत आणि यापुढे त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील. 
  • ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांचे सातत्य हे चेन्नई सुपर किंग्ससाठी मोठा प्लस पॉईंट ठरला आहे, पहिल्या तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराजनं नंतरच्या तीन सामन्यात धमाकेदार कामगिरी करून दाखवली.
  • फॅफ ड्यू प्लेसिसचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यानं क्षेत्ररक्षणात चपळता दाखवली शिवाय फलंदाजीतही सातत्यपूर्ण कामगिरी केली. तो CSKचा मोठा स्टार आहे.
  • हैदराबादकडून राशिद खाननं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) ७ विकेट्स राखून हा सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकले आहे. चेन्नईनं १८.३ षटकांत विजयी लक्ष्य पार केले. 
  • कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ चेंडूंत १०६ धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये  वॉर्रननं ५५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या. मनीष ४६ चेंडूंत ६१ धावा ( ५ चौकार व १ षटकार) करून बाद झाला. 
  • शार्दूल ठाकूरनं टाकलेल्या १९व्या षटकात केन विलियम्सननं २० धावा चोपल्या. अखेरच्या षटकात १३ धावा आल्या. केन १० चेंडूंत २६ आणि केदार जाधव ४ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. CSK Vs SRH Live Score, IPL 2021 CSK Vs SRH, CSK Vs SRH Live Match
  • प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे उपटली.  ऋतुराजनं ४४ चेंडूंत १२ चौकारांसह ७५ धावा केल्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.  
  • फॅफनं ३८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६ धावा केल्या. अखेरच्या पाच षटकांत चेन्नईला २४ धावांची गरज होती. रवींद्र जडेजा व सुरेश रैना यांनी CSKचा विजय पक्का केला. CSK Vs SRH Live Score, IPL 2021 CSK Vs SRH, CSK Vs SRH Live Match
     

Web Title: IPL 2021, CSK Vs SRH T20 Match Highlight : 5th consecutive win for CSK in IPL2021, SRH fifth defeat in six match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.