IPL 2021: कोहलीनं ज्याला नाकारलं... द्रविडच्या त्याच शिष्यानं घातलाय धुमाकूळ; दिग्गजांची घेतली विकेट!

IPL 2021: आयपीएलच्या लिलावात जिथं परदेशी खेळाडूंवर कोटयवधींची बोली लागते आणि पाण्यासारखा पैसा ओतला जातो. तर भारतीय खेळाडूंना तितकासा भाव दिला जात नाही. पण कमी रकमेत खरेदी केलेल्या खेळाडूंनीच यंदाच्या सीझनमध्ये धुमाकूळ घातला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 06:12 PM2021-04-28T18:12:38+5:302021-04-28T18:15:31+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 avesh khan delhi capitals fast bowler rahul dravid 2016 under 19 indian team | IPL 2021: कोहलीनं ज्याला नाकारलं... द्रविडच्या त्याच शिष्यानं घातलाय धुमाकूळ; दिग्गजांची घेतली विकेट!

IPL 2021: कोहलीनं ज्याला नाकारलं... द्रविडच्या त्याच शिष्यानं घातलाय धुमाकूळ; दिग्गजांची घेतली विकेट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: आयपीएलच्या लिलावात जिथं परदेशी खेळाडूंवर कोटयवधींची बोली लागते आणि पाण्यासारखा पैसा ओतला जातो. तर भारतीय खेळाडूंना तितकासा भाव दिला जात नाही. पण कमी रकमेत खरेदी केलेल्या खेळाडूंनीच यंदाच्या सीझनमध्ये धुमाकूळ घातला आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये वेगवान गोलंदाजीत आतापर्यंत भारतीय गोलंदाजांनी छाप पाडली आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळणारा हर्षल पटेल आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा आवेश खान यांचा समावेश आहे. या दोघांनीही आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. यात हर्षल पटेलनं १५ तर आवेश खान यानं १२ विकेट्स मिळवल्या आहेत. आवेश खान याची कहाणी भन्नाट आहे. आवेश खान २०१६ सालच्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघात सहभागी होती. आवेश खान यंदा आयपीएलमध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतोय. हे दोघंही २०१६ साली एकत्र खेळले आहेत. (ipl 2021 avesh khan delhi capitals fast bowler rahul dravid 2016 under 19 indian team)

IPL 2021: अरे बापरे! तणावमुक्तीसाठी आंद्रे रसेलनं सुचवला भन्नाट उपाय, नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण

२४ वर्षीय आवेश खान यानं यंदाच्या आयपीएलमध्ये गोलंदाजीतील वेगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं आतापर्यंत विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सुर्यकुमार यादव, जॉनी बेअरस्टो अशा तुफानी फलंदाजांना बाद केलं आहे. आवेश खान यानं धोनीला तर खातं देखील उघडू दिलं नव्हतं. धोनीला त्यानं शून्यावर माघारी धाडलं होतं. तर २७ एप्रिल रोजी विराट कोहलीला स्वस्तात बाद केलं होतं. धोनी आणि कोहली यांना आवेश खान यानं क्लीन बोल्ड केलं. 
विशेष म्हणजे, 2017 सालच्या आयपीएलमध्ये आवेश खान यानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पण आरसीबीनं त्याला करारमुक्त केलं. आता आवेश खान याला दिल्ली कॅपिटल्स संघानं आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं. यंदाच्या सहा सामन्यांमध्ये त्यानं विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या सहा सामन्यांमध्ये असा एकही सामना नाही की त्यानं विकेट घेतलेली नाही. 

दव्रिड म्हणाला होता १० लाख नव्हे कोट्यवधींचा खेळाडू हो!
२०१६ सालच्या आयपीएल लिलावाआधी आवेश खान याला कोणत्याच संघानं खरेदी केलं नव्हतं. त्यावेळी तो खूप निराश झाला होता. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारताकडून त्यानं सर्वाधिक बळी घेतले होते. त्यावेळी संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला म्हणाले होते, "१० लाख नव्हे, कोट्यवधी किमतीचा खेळाडू हो. त्यादृष्टीनं मेहनत घे". आज आवेश खान याची कामगिरी कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या परदेशी गोलंदाजापेक्षाही नक्कीच चांगली पाहायला मिळते आहे. दिल्ली कॅपिटल्स संघात इशांत शर्मा आणि उमेश यादव असे अनुभवी गोलंदाज असतानाही संघ व्यवस्थापनाकडून आवेश खान याच्यावर विश्वास दाखवला जात आहे. 

IPL 2021: रवी शास्त्री म्हणाले चित्र स्पष्ट आहे...; यंदाच्या आयपीएल विजेत्या संघाबाबत केली मोठी भविष्यवाणी!

आवेश खान याआधी फक्त चेंडूच्या वेगावर मेहनत घेत होता. मग त्यानं यॉर्कर आणि स्लो-कटर गोलंदाजीवर भर  दिला. त्यासोबत फिटनेसमध्येही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग देखील आवेश खानमधील प्रगतीनं खूश झाले आहेत.

Web Title: ipl 2021 avesh khan delhi capitals fast bowler rahul dravid 2016 under 19 indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.