IPL 2021 Auction Rules: ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर लावणार बोली; पण करावं लागेल ६ नियमांचं काटेकोर पालन, अन्यथा...

 6 most important rules, IPL 2021 Auction ऑक्शनला सामोरे जाताना फ्रँचायझींना सहा नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल, अन्यथा त्यांना भुर्दंड सहन करावा लागू शकतो...

By स्वदेश घाणेकर | Published: February 17, 2021 10:44 AM2021-02-17T10:44:58+5:302021-02-17T10:45:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Auction Rules: 6 most important rules that have to follow for CSK, MI, SRH, RR, KKR, KXIP, DC, RCB | IPL 2021 Auction Rules: ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर लावणार बोली; पण करावं लागेल ६ नियमांचं काटेकोर पालन, अन्यथा...

IPL 2021 Auction Rules: ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर लावणार बोली; पण करावं लागेल ६ नियमांचं काटेकोर पालन, अन्यथा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनमध्ये ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत. ( IPL 2021 Player Auction list – 292 cricketers, 61 Spots, 196.6 Cr). चेन्नईत गुरुवारी हे ऑक्शन होणार आहे. आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Mini-Auction) १११४ खेळाडूंनी नाव नोंदवली होती, परंतु ८ फ्रंचायझींनी यापैकी २९२ नावांची अंतिम यादी BCCIकडे सोपवली. ऑक्शनला सामोरे जाताना फ्रँचायझींना सहा नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल, अन्यथा त्यांना भुर्दंड सहन करावा लागू शकतो... (  6 most important rules )  IPL 2021 Acution list : २९२ खेळाडू, ६१ जागा अन् आयपीएल फ्रँचायझींकडून १९६.६ कोटींचा पाऊस!

आयपीएल ऑक्शनसाठी सर्व फ्रँयाचझीच्या संबंधित व्यक्ती चेन्नईत एक दिवस आधीच पोहोचले आहेत. त्यांची कोरोना चाचणी होईल.. पण, चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून ऑक्शनमध्ये भाग घेणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर हेही ऑक्शनमध्ये भाग घेणार नाहीत. महेंद्रसिंग धोनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला असता; पण, न खेळण्यास कारण ठरला सचिन तेंडुलकर

IPL Auction 2021 चे सहा नियम ( 6 most important rules )
नियम १ : कोणत्याही फ्रँचाझीला त्यांच्या पर्समध्ये उपलब्ध असलेल्या रक्कमेपेक्षा अधिक बोली लावता येणार नाही.  
IPL 2021 Auction : ३९ स्वदेशी अन् २२ परदेशी खेळाडूंवर लागेल १९६ कोटींपर्यंत बोली; जाणून घ्या प्रत्येक संघाकडे किती रक्कम

नियम २ : BCCI आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या नियमानुसार सर्व फ्रँचायझींना त्यांच्या एकूण रक्कमेतील ७५ टक्के रक्कम ही खेळाडूंवर खर्च करावी लागले. असं करण्यात कोणती फ्रँचायझी अपयशी ठरल्यास त्यांची उर्वरित रक्कम जप्त केली जाईल

नियम ३ : यंदा मेगा ऑक्शन होणार नाही. त्यामुळे RTM म्हणजेच राईट टू मॅच कार्ड वापरता येणार नाही.  

IPL Auction 2021 : मोहम्मद अझरुद्दीनसह १० अनकॅप खेळाडूंसाठी फ्रँचायझी पाडणार पैशांचा पाऊस!

नियम ४ : प्रत्येक संघात  २५ खेळाडू असायला हवेत. परंतु प्रत्येक संघानं किमान १८ खेळाडूंचा कोटा पूर्ण करायलाच हवा.

नियम ५: कॅप आणि अनकॅप अशी मिळून भारतीय खेळाडूंची संख्या कमीतकमी १७ आणि जास्तीत जास्त २५ होऊ शकते.

नियम ६: आयपीएलच्या एका संघात ८ हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू असायला नकोत. अंतिम ११मध्ये चारच परदेशी खेळाडू खेळतील

IPL 2021 Auction : हरणार नाही, लढणार!; ८ वर्ष थांबलो, त्यात आणखी एक वर्ष; एस श्रीसंत प्रचंड नाराज

IPL चं मेगा ऑक्शन vs मिनी ऑक्शन
चेन्नईत १८ फेब्रुवारीला मिनी ऑक्शन होणार आहे. मेगा ऑक्शन ३ वर्षांनी होतो. तर मिनी ऑक्शन प्रत्येक वर्षी होतो. मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक फ्रँचायझी ५ खेळाडूंना रिटेन करू शकते, तर मिनी ऑक्शनमध्ये रिटेन करणाऱ्या खेळाडूंच्या संख्येला मर्यादा नाही. IPL 2021 साठी सर्व फ्रँचायझींची मोर्चेबांधणी; जाणून घ्या कोणाला ठेवले संघात अन् कोणाला रिलीज!

Web Title: IPL 2021 Auction Rules: 6 most important rules that have to follow for CSK, MI, SRH, RR, KKR, KXIP, DC, RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.