Join us

IPL 2020 : क्रिएटिव्ह सौरव गांगुली; फोटोत दिसत होते पाकिस्तानी खेळाडू; दादानं केलं असं काही!

IPL 2020: BCCI अध्यक्ष गांगुलीनं UAEतील स्टेडियम्सची पाही केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 16:14 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत.  मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना ( Opening Match) होणार आहे. मुंबई इंडियन्स ( MI) पाचव्या जेतेपदासाठी सज्ज आहेत आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांच्यासह सर्व खेळाडूंनी सरावात तुफान फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजी केली आहे. CSKनेही सर्व अडचणींवर मात करून जोमाने तयारी केली. दरम्यान, IPL 2020साठीच्या तयारीचा BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने ( Sourav Ganguly) आढावा घेतला. 

महेंद्रसिंग धोनीला Miss करतेय साक्षी; माहीला पाहण्याची व्यक्त केली इच्छा अन्... Video

BCCI अध्यक्ष गांगुलीनं UAEतील स्टेडियम्सची पाही केली. कोरोना व्हायरसमुळे प्रथमच संपूर्ण आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्यात येत आहे. गांगुलीनं सोमवारी येथील शाहजाह स्टेडियमला भेट दिली. त्याच्यासोबत अमिराती क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांसह IPL चेअरमन ब्रिजेश पटेल आणि राजीव शुक्ला हेही होते. शाहजाह क्रिकेट स्टेडियमची पाहणी करतानाचे फोटो गांगुलीनं त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले. पण, त्याच्या या फोटोत पाकिस्तानी खेळाडू दिसत असल्यानं त्यानं त्यांचा फोटो ब्लर केला.   गांगुलीनं कोणाचा फोटो ब्लर केला?पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आणि रशीद लतिफ यांचा तो फोटो होता. गांगुलीनं सहकाऱ्यांसह जेथे उभे राहून फोटो काढला त्याच्या मागच्या बाजूला पाकिस्तानी खेळाडूंचा फोटो दिसत होता. पण, गांगुलीनं स्वतःच्या इस्टा अकाऊंटवर त्याचा फोटो पोस्ट करण्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंचा तो फोटो ब्लर केला.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

IPL 2020: महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक, शिखर खेळले 'गल्ली' क्रिकेट; पाहा Video

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

टॅग्स :आयपीएल 2020सौरभ गांगुलीबीसीसीआय