अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

BCCI त्याला खेळण्याची परवानगी देऊ शकते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:18 PM2020-09-15T13:18:26+5:302020-09-15T13:19:27+5:30

whatsapp join usJoin us
Has Arjun Tendulkar joined Mumbai Indians? why he has travelled to UAE with Rohit Sharma-led side | अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) opening matchमुंबई इंडियन्स ( MI) पाचव्या जेतेपदासाठी सज्ज

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात IPL2020 होत असल्यानं क्रिकेट चाहत्यांचेच नाही, तर सर्वांचं टेंशन हलकं होईल, असा दावा केला जात आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना ( Opening Match) होणार आहे. मुंबई इंडियन्स ( MI) पाचव्या जेतेपदासाठी सज्ज आहेत आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांच्यासह सर्व खेळाडूंनी सरावात तुफान फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजी केली आहे.

पण, मुंबई इंडियन्सच्या ( MI) चाहत्यांना एका गोष्टीनं संभ्रमात टाकले आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत UAEत दिसला. त्यामुळे यंदाच्या पर्वात अर्जुन MI पदार्पण करणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लसिथ मलिंगा ( Lasith Malinga) यानं वैयक्तिक कारणास्तव IPL 2020मधून माघार घेतल्यानंतर त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटीन्सन याची निवड केली आहे. त्यात अर्जुनही MIच्या खेळाडूंसोबत दिसल्यानं यंदा तो आयपीएलमध्ये पदार्पण करतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अर्जुन MIचे खेळाडू ट्रेंट बोल्ट ( Trent Boult), जेम्स पॅटिन्सन ( James Pattinson) आणि अन्य खेळाडूंसोबत स्विमिंगपूलमध्ये दिसला. पण, अर्जुन हा IPL Auction 2020चा भाग नव्हता, तरीही तो संघासोबत दिसल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

याआधीही अर्जुन मुंबई इंडियन्सच्या ( MI) खेळाडूंसोबत दिसला होता. पण, यंदा ही स्पर्धा भारतात नव्हे, तर UAEत होत असल्यानं अर्जुन तिथे काय करतोय, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

मुंबई इंडियन्सकडून अर्जुन खेळणार का? 
नाही. अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही. UAEत तो नेट गोलंदाज म्हणून गेला आहे. प्रत्येक फ्रँचायझी त्यांच्यासोबत काही नेट बॉलर्स घेऊन गेले आहेत आणि अर्जुन हा त्यापैकी एक आहे.  


20 वर्षीय अर्जुन टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टीसमध्येही अनेकदा गोलंदाजी करताना दिसला होता. याशिवाय 2017च्या महिलांच्या वर्ल्ड कप फायनलपूर्वी त्यानं भारतीय महिला संघातील खेळाडूंना गोलंदाजी केली होती. काही महिन्यांपूर्वी अर्जुनच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो दुखापतग्रस्त झाला  होता.  

अर्जुन MIकडून भविष्यात खेळू शकतो?
हो. एखाद्या खेळाडूनं माघार घेतल्यास MI अर्जुनला करारबद्ध करू शकतो. तो लिलावाचा भाग नव्हता, परंतु नियामानुसार BCCI त्याला बदली खेळाडू म्हणून खेळण्याची परवानगी देऊ शकते. अर्जुन अजूनही वरिष्ठ संघाकडून खेळलेला नाही. त्यानं 2018मध्ये 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.

 

मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान. 

जाणून घ्या मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक ( Mumbai Indians Schedule, IPL 2020 )

19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
23 सप्टेंबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 ऑक्टोबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
4 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजाह
6 ऑक्टोबर, मंगळवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
11 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
18 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह

Web Title: Has Arjun Tendulkar joined Mumbai Indians? why he has travelled to UAE with Rohit Sharma-led side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.