Join us  

IPL 2020 : विराट कोहलीनं सामना तर गमावलाच शिवाय 12 लाखांचा दंडही भरावा लागला, जाणून घ्या कारण

IPL 2020 : 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा संपूर्ण संघ 17 षटकांत 109 धावांत माघारी परतला

By स्वदेश घाणेकर | Published: September 25, 2020 5:08 PM

Open in App

RCB vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League 2020) गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) च्या तडाख्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचा पालापाचोळा झाला. KXIPचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) वादळी शतकी खेळी करताना RCBच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर KXIPने 3 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा संपूर्ण संघ 17 षटकांत 109 धावांत माघारी परतला. KXIPने हा सामना 97 धावांनी जिंकला. विराट कोहलीला या सामन्यात मानहानिकारक पराभव पत्करावा लागलाच, शिवाय 12 लाखांचा दंडही भरावा लागला. IPL 2020 Updates

IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली

IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल

प्रमथ फलंदाजीला आलेल्या KXIPला लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी करून दिली. मयांक 26 धावांवर माघारी परतला. त्यानंतर निकोलस पूरन ( 17), ग्लेन मॅक्सवेल ( 5) हेही लगेच माघारी परतले. मात्र, लोकेशनं एका बाजूनं आतषबाजी करताना 69 चेंडूंत 14 चौकार व 7 षटकारांसह नाबाद 132 धावा केल्या. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना देवदत्त पडीक्कल ( 1), जोश फिलिप ( 0), विराट कोहली ( 1) हे लगेच माघारी पतल्यानं RCBची अवस्था 3 बाद 4 अशी झाली होती. अॅरोन फिंच ( 20) आणि एबी डिव्हिलियर्स ( 28) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु KXIPच्या गोलंदाजांनी त्यांनाही दणका दिला. IPL 2020 Updates

लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद

रवी बिश्नोई आणि एम अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर शेल्डन कॉट्रेल ( 2 विकेट्स), मोहम्मद शमी ( 1) आणि ग्लेन मॅक्सवेल ( 1) यांनीही विजयात हातभार लावला. RCBला या पराभवानंतर आणखी एक दणका बसला. कर्णधार विराट कोहलीला षटकांचा वेग संथ ठेवल्यामुळे ( slow over-rate ) 12 लाखांचा दंड सुनावण्यात आला. IPL2020मधील 6व्या सामन्यातील पहिला डाव हा निर्धारित वेळेपेक्षा उशीरा संपला. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी हा दंड सुनावला.  IPL 2020 Updates

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका

टॅग्स :IPL 2020विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकिंग्स इलेव्हन पंजाब