IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल

IPL 2020 : KL Rahulने 69 चेंडूंत 14 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 132 धावा चोपल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: September 25, 2020 04:02 PM2020-09-25T16:02:50+5:302020-09-25T16:03:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Rajasthan Royals come up with hilarious tweet after KL Rahul’s record knock vc RCB | IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल

IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देKL Rahulने 69 चेंडूंत 14 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 132 धावा चोपल्याKXIPच्या 3 बाद 206 धावा, RCB चा संपूर्ण संघ 17 षटकांत 109 धावांत माघारी

RCB vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League 2020) गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) च्या तडाख्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचा पालापाचोळा झाला. KXIPचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) वादळी शतकी खेळी करताना RCBच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर KXIPने 3 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा संपूर्ण संघ 17 षटकांत 109 धावांत माघारी परतला. लोकेश राहुलच्या या वादळी खेळीनंतर राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) केलेलं ट्विट व्हायरल होत आहे. IPL 2020 Updates

IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली

राजस्थान रॉयल्सनं (RR) ट्विट केलं की,''लोकेश राहुल आज अफलातून खेळ केलास... आम्हाला असं वाटतंय की पुढच्या सामन्यात तू विश्रांती करायला हवी. '' किंग्स इलेव्हन पंजाबचा ( KXIP) पुढील सामना 29 सप्टेंबरला RRविरुद्ध आहे.  IPL 2020 Updates

लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद

राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले
राहुलनं शानदार शतक साकारत आज अनेक विक्रम मोडीत काढले. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम राहुलच्या नावावर जमा झाला आहे. हा विक्रम आधी डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. वॉर्नरनं २०१७ मध्ये हैदराबादचं नेतृत्त्व करताना १२६ धावांची खेळी साकारली होती. २०११ मध्ये विरेंद्र सेहवागनं दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना ११९ धावा केल्या होत्या. २०१६ मध्ये आरसीबीचं कर्णधारपद भूषवताना विराट कोहलीनं तीन शतकं (११९ धावा, १०९ धावा, १०८ धावा नाबाद) झळकावली आहेत. 

आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही आता राहुलकडे आहे. रिषभ पंतनं २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२८ धावांची खेळी केली होती. पंतचा विक्रम आज राहुलनं मोडीत काढला. पंतनंतर मुरली विजय (चेन्नईकडून खेळताना १२७ धावा), विरेंद्र सेहवाग (पंजाबकडून खेळताना १२२ धावा), पॉल वेल्थॅटी (पंजाबकडून खेळताना नाबाद १२० धावा) यांचा क्रमांक लागतो. IPL 2020 Updates

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळत असताना आणि कर्णधार म्हणून खेळत नसताना शतक झळकावण्याची किमया आतापर्यंत केवळ दोन खेळाडूंना जमली होती. विरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर यांनाच ही कामगिरी जमली आहे. आता राहुलच्या नावावरही ही कामगिरी जमा झाली आहे. IPL 2020 Updates

Web Title: IPL 2020 : Rajasthan Royals come up with hilarious tweet after KL Rahul’s record knock vc RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.