IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वातील शाहजात झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) पराभूत केले. 217 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असताना महेंद्रसिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni) 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावरून महेंद्रसिंग धोनीवर ( MS Dhoni) प्रचंड टीका झाली.

धोनीनं या मागचं लॉजिक सामन्यानंतर समजावून सांगितले. IPL 2020 ची सुरुवात आहे आणि काही गोष्टींची चाचपणी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे धोनीनं सांगतिले होते. पण, धोनीनं असा निर्णय काही पहिल्यांदाच घेतलेला नाही, यापूर्वीही त्याच्या अनेक निर्णयामागचे लॉजिक अनेकांना पटलेले नाहीत.

1) 217 धावांचा पाठलाग करताना महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानं स्वतःच्या आधी सॅम कुरन व ऋतुराज गायकवाड यांना पाठवले. सामन्यानंतर धोनीनं 7व्या क्रमांकावर येण्यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला,''मी बराच कालावधी फलंदाजी केलेली नाही. 14 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीतही फार मदत मिळाली नाही. शिवाय ही लीगची सुरुवातच आहे आणि त्यामुळे काही नवीन गोष्टींची चाचपणी करायची होती. त्यामुळे सॅमला संधी दिली. आता प्रयोग करण्याची संधी आहे. जर ते यशस्वी झाले नाही, तर आपल्या जुन्हा स्ट्रॅटजीनं मैदानावर उतरू.'

2) रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व सांभाळताना धोनीनं युवा गोलंदाजांना संधी देण्याचं सोडून वयस्कर गोलंदाजांना खेळवलं. CSKचे नेतृत्व सांभाळताना धोनीनं संघाला 11 पैकी 10 वेळा प्ले ऑफपर्यंत मजल मारली. पण, 2016चा मोसम त्याला अपवाद ठरला. त्यानं इरफान पठाण, रजत भाटीया, आरपी सिंग, अकोस दिंडा आणि इशांत शर्मा यांना खेळवले, परंतु यापैकी कोणालाच चांगली कामगिरी करता आली नाही. त्या पर्वातील 49व्या सामन्यात RPSने दीपक चहरला संधी दिली, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. इश्वर पांडे व जस्करन सिंग यांना एकही सामना खेळता आला नाही.

3) 2014च्या Champions League T20मध्ये महेंद्रसिंग धोनीनं कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाविरुद्ध मोहित शर्मा की इश्वर पांडे यांच्यापैकी केलेली निवड चुकली. 157 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना KKRच्या सलामीवीरांना माघारी पाठवून CSKने पकड घेतली होती. तिसऱ्या षटकात आशिष नेहरानं KKRच्या मनीष पांडेला बाद केले त्यानंतर मोहित शर्मा गोलंदाजीला येणं अपेक्षित होता, परंतु धोनीनं इश्वर पांडेला पाचारण केले. पण, याबाबत मोहितला काहीच माहित नव्हतं आणि त्यानं इश्वरकडे चेंडू मागितला. मोहित निम्म्या अंतरापर्यंत धावल्यानंतर धोनीनं त्याला थांबवले. तेव्हा पंचांनी नियम सांगून मोहितलाच गोलंदाजी करण्यास सांगितले. या सामन्यात CSKला पराभव पक्तरावा लागला.

4) अॅल्बी मॉर्कल या दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूनं CSKच्या 2010 आणि 2011च्या जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण, 2009च्या मोसमात त्याच्या जागी जेकब ओराम व अँड्य्रू फ्लिंटॉप याला खेळवण्याचा निर्णय घेतला. 14 सामन्यांत या दोघांनी मिळून केवळ 150 धावा आणि 8 विकेट्स घेतल्या. तेव्हा फ्लिंटॉफला 7.55 कोटींत ताफ्यात घेतले होते.

5) IPL 2020पूर्वी CSKला सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या माघारीमुळे मोठे धक्के बसले. त्यांना बदली खेळाडू अजूनही जाहीर केलेले नाहीत. पण, त्यांच्या अऩुपस्थितीत संघाची कमकुवत बाजू समोर येत आहे. धोनीकडे भारतीय अष्टपैलू खेळाडूच पर्यायच नाही. केदार जाधव गोलंदाजी कतो, परंतु त्याला अजूनही संधी दिलेली नाही. पीयूष चावल आणि रवींद्र जडेजा यांना मागील दोन सामन्यांत चांगलेच चोपले आहे.

Read in English